अजित पवार कुठल्या राष्ट्रवादीत आहेत हे पाहावं लागेल : जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रात काल (23 नोव्हेंबर) पहाटे मोठा राजकीय भूंकप (Jitendra aawhad talk on ajit pawar) झाला. त्यामुळे राज्यातील राजकारणाला नवे वळण लागले आहे.

अजित पवार कुठल्या राष्ट्रवादीत आहेत हे पाहावं लागेल : जितेंद्र आव्हाड

मुंबई : महाराष्ट्रात काल (23 नोव्हेंबर) पहाटे मोठा राजकीय भूंकप (Jitendra aawhad talk on ajit pawar) झाला. त्यामुळे राज्यातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी थेट भाजपसोबत जाऊन सरकार स्थापने केले. यावरुन अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही (Jitendra aawhad talk on ajit pawar) अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

“अजित पवार हे कुठल्या पक्षात आहेत हे मला माहित नाही. काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि कायम बरोबर राहणार. अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत हे पाहावं लागेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजित पवारांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाही. त्यावर त्यांनी आज (24 नोव्हेंबर) थेट ट्विटरवर आपली प्रतिक्रिया मांडत मी राष्ट्रवादीतच आहे आणि कायम राहणार, असं ट्वीट केलं

“मी राष्ट्रवादीतच आहे आणि कायम राहणार. शरद पवारच आमचे नेते आहेत. पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रवादी आणि भाजप हे महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकेल”, असं अजित पवारांनी ट्वीट करत म्हटले.

अजित पवारांच्या ट्वीटमुळे सर्वत्र एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी तातडीने ट्विटरवर अजित पवारांच्या ट्वीटला उत्तर दिले आहे.

“राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी झालेली नाही. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आघाडीसोबत सत्तास्थापन करणार आहे. अजित पवारांचे ट्वीट खोटे, दिशाभूल करणारे आहे”, असं शरद पवारांनी ट्वीट केले.

दरम्यान, अजित पवारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूंकप झाला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत फूट फडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालपासून अजित पवारांना अनेक राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांकडून मनवण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप अजित पवार राष्ट्रवादीत परतलेले नाहीत.

Published On - 7:27 pm, Sun, 24 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI