दररोज 1500 लोकं आपली माणसं गमावताहेत, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर उपाययोजनांची आवश्यकता, अमोल कोल्हे हळहळले

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीवर आपली भूमिका मांडली (NCP MP Amol Kolhe demand MPLAD fund from Modi Government).

दररोज 1500 लोकं आपली माणसं गमावताहेत, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर उपाययोजनांची आवश्यकता, अमोल कोल्हे हळहळले
खासदार अमोल कोल्हे
चेतन पाटील

|

Apr 20, 2021 | 11:19 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी देशात सध्या आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याची जास्त आवश्यकता असल्याचं मत मांडलं आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारने खासदार कोट्यातील निधींची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. तसेच देशातील कोरोना परिस्थिती भयानक आहे. दररोज 1500 पेक्षा जास्त रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या बांधकामावर पैसे खर्च करण्याआधी आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला प्राधान्य द्यावे, असेही अमोल कोल्हे यांनी सूचवले आहे (NCP MP Amol Kolhe demand MPLAD fund from Modi Government).

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

“आपला देश सध्या भयानक परिस्थितीशी झुंजत आहे. देशातील आरोग्याची पायाभूत सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे. भारताला सध्या नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड सेंटर, आरोग्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण साधनसामग्री यांची जास्त आवश्यकता आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले (NCP MP Amol Kolhe demand MPLAD fund from Modi Government).

‘ MPLAD निधीचे पैसे द्या’

“देशात दररोज 2 लाखांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर दररोज 1500 लोक आपल्या जवळच्या माणसाला गमावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्राधान्याने नेमकं कोणत्या ठिकाणी पैसे खर्च करावे याबाबत ठरवावे. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयाने MPLAD निधी जाहीर करावे, जेणेकरुन खासदारांना आपापल्या मतदारसंघात आवश्यक उपाययोजना उभारण्यासाठी त्याचा वापर करता येईल”, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें