NCP Rupali Chakankar | प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुपाली चाकणकर रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात (Rupali Chakankar Hospitalized) आलं आहे.

NCP Rupali Chakankar | प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुपाली चाकणकर रुग्णालयात दाखल
| Edited By: | Updated on: Jul 20, 2020 | 7:29 AM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात (Rupali Chakankar Hospitalized) आलं आहे.  पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांना रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

रुपाली चाकणकर यांची कोरोनाची चाचणी देखील करण्यात आली आहे. सुदैवाने त्यांच्या कोरोनाचा चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर या जालना दौऱ्यावर गेल्या होत्या. मात्र पुण्यात आल्यापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ वाटत होती. त्यांना डेंग्यूचीही लक्षणही जाणवत होती. त्यांच्या पेशी कमी-जास्त होत होत्या. त्यामुळे त्यांना पुण्याच्या सिंहगड रोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या ठिकाणी उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, आज त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले (Rupali Chakankar admitted Hospitalized) आहेत.

संबंधित बातम्या : 

बापट म्हणाले, अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, रुपाली चाकणकर म्हणतात, मोदींना सांगा