AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींच्या पुढील कॅबिनेट बैठकीची तारीखही ठरली?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा पूर्ण विश्वास आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीपूर्वी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी मोदींनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. लोकांच्या या समर्थनामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचं मोदींनी मंत्र्यांना सांगितलं. बैठकीत मोदींनी निवडणुकीनंतरच्या प्रक्रियेबाबत सांगितल्याचीही माहिती आहे. निकालानंतर पुन्हा […]

पंतप्रधान मोदींच्या पुढील कॅबिनेट बैठकीची तारीखही ठरली?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 22, 2019 | 5:38 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा पूर्ण विश्वास आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीपूर्वी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी मोदींनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. लोकांच्या या समर्थनामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचं मोदींनी मंत्र्यांना सांगितलं.

बैठकीत मोदींनी निवडणुकीनंतरच्या प्रक्रियेबाबत सांगितल्याचीही माहिती आहे. निकालानंतर पुन्हा एकदा 25 मे रोजी कॅबिनेट बैठकीची गरज पडेल, असं मोदी म्हणाल्याची माहिती आहे. त्यामुळे कॅबिनेटची बैठक निकालानंतर दोन दिवसातच होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी जेव्हा बैठकीत प्रचारादरम्यान लोकांनी दिलेल्या प्रेमाविषयी सांगत होते तेव्हा भावूकही झाले. 24 तारखेला सर्व निकाल हाती आल्यानंतर 25 मे रोजी पुन्हा एकदा कॅबिनेट बैठकीची गरज पडेल. या बैठकीत सोळावी लोकसभा विसर्जित करण्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देशाच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतल्याचीही माहिती आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हा आढावा घेण्यात आला. मोदींनी यापूर्वीच पुढील 100 दिवसांचा प्लॅन तयार केल्याचंही सांगितलं जातंय. नवीन सरकार आल्यानतंर नियोजनातच जास्त वेळ जातो. त्यामुळे हे नियोजन केल्याची माहिती आहे.

एनडीएच्या बैठकीत सर्व प्रमुख नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. एक्झिट पोलप्रमाणेच 23 मे रोजी भाजपच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल असं सांगण्यात आलं. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी, एलजेपी प्रमुख रामविलास पासवान, अकाली दल प्रमुख प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर सिंह बादल यांची उपस्थिती होती.

VIDEO :

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...