AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे भाजपचे गुलाम, सावरकरांचा कागद वाचून दाखवण्याच्या व्हायरल video वरून संजय राऊत यांचा घणाघात

भाजप आणि शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल करत भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे भाजपचे गुलाम, सावरकरांचा कागद वाचून दाखवण्याच्या व्हायरल video वरून संजय राऊत यांचा घणाघात
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 28, 2023 | 10:42 AM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान मी सावरकर नाही, मी गांधी आहे. मी माफी मागणार नाही अशा स्वरूपाचे विधान केलं होतं. आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला. ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच आपल्याच बघायला मिळालं. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गट असल्याने त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी अशी भूमिका भाजपासह शिवसेना शिंदे गटाकडून केली जात होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहीर आपली भूमिका स्पष्ट केली होती.

मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना इशारा देत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दलचा अपमान सहन केला जाणार नाही आपण लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हणत भूमिका स्पष्ट केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या याच भूमिकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी पत्रकार परिषद घेत बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल बोलण्यावरून मनीशंकर अय्यर यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचा फोटो दाखवत उद्धव ठाकरे यांना तुम्ही राहुल गांधी यांच्या कानशिलात लगावणार का असा सवाल केला होता.

याच दरम्यान मुख्यमंत्री यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वीर सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचे जाहीर करत उद्धव ठाकरे यांची अडचण वाढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपने आणि आरएसएसने विरोध केला होता, त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि हे काय आम्हाला सांगणार स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते भाजपचा हा ढोंगीपणा असल्याचं टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी त्यांच्यातील वाचू का हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरही संजय राऊत यांनी जोरदार टीका केली असून थेट गुलामीच काढली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना एक कागद दाखवून वाचू का असे म्हणतात त्यावरूनच त्यांची गुलामी कळते असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.