AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse | जे पी नड्डांची नवी टीम, एकनाथ खडसेंसह महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याचं नाव चर्चेत

नाराजी नाट्यानंतर, (Eknath Khadse may in J P Naddas team) भाजप आता नाराजांना केंद्रातील टीममध्ये स्थान देण्याची शक्यता आहे.

Eknath Khadse | जे पी नड्डांची नवी टीम, एकनाथ खडसेंसह महाराष्ट्रातील आणखी एका नेत्याचं नाव चर्चेत
| Updated on: May 21, 2020 | 7:15 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकांमध्ये रंगलेल्या नाराजी नाट्यानंतर, (Eknath Khadse may in J P Naddas team) भाजप आता नाराजांना केंद्रातील टीममध्ये स्थान देण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नव्या टीमची घोषणा करणार आहेत. या टीममध्ये महाराष्ट्र भाजपच्या नाराज नेत्यांना संधी मिळण्याची चिन्हं आहेत. (Eknath Khadse may in J P Naddas team)

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामध्ये नाराज नेते एकनाथ खडसे आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे हे प्रचंड नाराज असल्याचं गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं होतं. त्यांनी विधानपरिषद तिकीट मागितलं होतं. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारुन, बाहेरुन आलेल्या नेत्यांना तिकीट दिल्याचा आरोप, खुद्द खडसे यांनी केला होता. खडसेंनी चंद्रकांत पाटील यांचं नाव घेऊन तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

हेही वाचा : नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…… : चंद्रकांत पाटील

या पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांना थेट जे पी नड्डा यांच्या टीममध्ये स्थान मिळण्याची चिन्हं आहेत. मात्र एकनाथ खडसे हे पद स्वीकारणार का? हा प्रश्न आहे. कारण आपण आयुष्यभर पक्ष आणि संघटना वाढीसाठी झिजलो आहे, असं ते वारंवार सांगत असतात. त्यामुळे ना आमदारकी, ना खासदारकी मिळाल्याने खडसे संघटनेत काम करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विधानपरिषद तिकीट नाकारलं

दरम्यान, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून चार उमेदवार देण्यात आले होते. यामध्ये भाजपने गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, रमेश कराड आणि प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने हे चौघेही विधानपरिषदेचे सदस्य बनले. मात्र आपल्याला तिकीट न दिल्याने एकनाथ खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

संबंधित बातम्या 

विधानसभेला पडल्याने पंकजाताईंना विधानपरिषद तिकीट नाकारलं, मग पडळकरांना कसं दिलं? खडसेंचा सवाल

नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…… : चंद्रकांत पाटील  

Chandrakant Patil Exclusive | विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.