नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…… : चंद्रकांत पाटील

"नाथाभाऊंसाठी तिकीट हा क्षुल्लक विषय आहे. त्यांची पक्षाशी नाळ जोडली गेली आहे", असं चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil appeal Eknath Khadse ).

नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण...... : चंद्रकांत पाटील

मुंबई :नाथाभाऊ आमचे वडील आहेत (Chandrakant Patil appeal Eknath Khadse ). नाथाभाऊंनी आम्हाला मुक्ताईनगरात नेऊन दोन थोबाडीत माराव्या, पण त्यांनी घरची भांडणं जगासमोर आणू नयेत”, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना केलं. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांना विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्याच्या कारणांवर चंद्रकांत पाटलांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बातचित केली (Chandrakant Patil appeal Eknath Khadse ).

“नाथाभाऊंसाठी तिकीट हा क्षुल्लक विषय आहे. त्यांची पक्षाशी नाळ जोडली गेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि नाथाभाऊ यांचं सविस्तर बोलणं झालं आहे. जर लॉकडाऊन नसता तर मी स्वत: चारवेळा मुक्ताईनगरला गेलो असतो”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“नाथाभाऊ हे मुरलेले हुशार राजकारणी आहेत. ते बुडत्या जहाजात बसणार नाहीत. काँग्रेसने त्यांना ऑफर दिली तर मग पहिली सीट का नाही दिली? त्यांनी सहाव्या जागेची का ऑफर दिली? “, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

“नाथाभाऊंना पक्षाकडून खूप मिळालं. अजून मिळायला हवं. पण मिळालं नाही म्हणून लगेच पक्ष सोडण्याची भाषा करु नये, ते आमचे मार्गदर्शक आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“नाथाभाऊचं समाधान झालं की नाही माहित नाही. पण त्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये ही अंबाबाई चरणी प्रार्थना, कुटुंबात भांडणं होतात तशी पक्षातही होतात, ती संपतात”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“आपल्या घरातील भांडणं, मतभेद घेऊन टीव्हीवर जावं, अशी आमची कार्यपद्धती नाही. एकच बाजू जगासमोर येत आहे. खोटे आरोप इतके केले जात आहेत की आता ते ऐकूण मलादेखील वाटायला लागलंय की हे खरं आहे की काय? त्यामुळे मी तुमच्यासमोर आलो आहे”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं

“एवढ्या मोठ्या नेत्यांनी पक्षाची बदनामी होणारं वक्तव्य कशाचा आधारावर करतोय? हे बघायला हवं. तुम्ही 40 वर्षे राजकारणात आहात. ज्यावेळेला एखाद्या निवडणुकीच्या वेळी केंद्रात तुम्ही नावं पाठवतात तेव्हा केंद्राकडून आणखी काही नावं मागितली जातात. त्यामुळे सर्व तयारी करावी लागते. कारण फॉर्म भरणं आता तितकं सोपं राहिलेलं नाही. दोन ते तीन दिवस लागतात. आता तर लॉकडाऊन आहे. त्यामुळे सहा जणांना तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही मात्र तयारी करुन ठेवा असं सांगितलं होतं. मिळालं तर ठीक. आता हेच वर्षोनुवर्षे नाथाभाऊंनी केलं नाही का?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

संबंधित बातम्या :

चंद्रकांत पाटील Exclusive | विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील

माझं तिकीट, माझा मतदारसंघ हिसकावला, असं माझं काही नसतं, सगळं पक्षाचं असतं : चंद्रकांत पाटील

7 वेळा आमदारकी, सुनेला खासदारकी, मुलीला तिकीट, मुलाला उमेदवारी, नाथाभाऊंना आणखी काय हवं? : चंद्रकांत पाटील

Published On - 5:03 pm, Wed, 13 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI