AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्शाल्लाह निदा खानला…, नाशिक टीसीएस प्रकरणात असदुद्दीन ओवैसी यांचं सर्वात मोठं वक्तव्य

आज छत्रपती संभाजीनगमध्ये एमआयएमची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाशिक टीसीएस प्रकरणावर बोलताना निदा खानबद्दल मोठं विधान केलं आहे.

इन्शाल्लाह निदा खानला..., नाशिक टीसीएस प्रकरणात असदुद्दीन ओवैसी यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Asaduddin OwaisiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 09, 2026 | 3:35 PM
Share

नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मास्टरमांईड असलेली निदा खान तब्बल 42 दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निदा खानला अटक केलं. दरम्यान निदा खानला अटक केल्यानंतर तिला शुक्रवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिक सत्र न्यायालयानं निदा खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या तिची एसआयटीकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी निदा खानबद्दल मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले ओवैसी? 

निदा खान एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करत नव्हती, असा दावा ओवैसी यांनी केला आहे.  एफआयआर दाखल होण्यापूर्वीच निदा खानची ट्रान्सफर झाली होती.  आम्हाला विश्वास आहे, की कोर्ट न्याय करेल. आरोप सिद्ध होईपर्यंत कोणीही दोषी ठरत नाही. आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावेत. राजकीय द्वेषातून आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे इन्शाल्लाह निदा खानला न्याय मिळेल, तिच्यावरचे आरोप सिद्ध होणार नाहीत, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या काही लोकांकडून मीडिया ट्रायल सुरू आहे. टीसीएस कंपनीतील तक्रारदार हा राजकीय पक्षासी संबंधित आहे, असा आरोपही यावेळी निदा खान प्रकरणात ओवैसी यांनी केला आहे.  निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाहीत, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण समोर आल्यानं संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकणातील इतर आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. मात्र निदा खान 42 दिवस फरार होती. अखेर तिला देखील आता अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, तिची सध्या एसआटीकडून चौकशी सुरू आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?