वाया गेलेल्या मुलाच्या फ्रस्टेड बापाचं भाषण, श्रावणबाळ आदित्य दिनोच्या घरी तुळशीपूजेला जातो का? : नितेश राणे

मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण म्हणजे वाया गेलेल्या मुलाच्या फ्रस्टेड बापाचं भाषण आहे, अशी टीका करतानाच 'श्रावणबाळ' आदित्य ठाकरे दिनोच्या घरी संध्याकाली तुळशीपूजेला जातो का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला.

वाया गेलेल्या मुलाच्या फ्रस्टेड बापाचं भाषण, श्रावणबाळ आदित्य दिनोच्या घरी तुळशीपूजेला जातो का? : नितेश राणे
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 1:59 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात केलेल्या भाषणावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण म्हणजे वाया गेलेल्या मुलाच्या फ्रस्टेड बापाचं भाषण आहे, अशी टीका करतानाच ‘श्रावणबाळ’ आदित्य ठाकरे दिनोच्या घरी संध्याकाळी तुळशीपूजेला जातो का?, असा सवाल नितेश राणे यांनी केला. (nitesh rane attacks cm uddhav thackeray)

आमदार नितेश राणे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी खास संवाद साधताना ही टीका केली. काल मुख्यमंत्र्यांचं किंवा शिवसेना पक्षप्रमुखाचं भाषण झालंच नाही. काल एका वाया गेलेल्या मुलाच्या बापाचं भाषण झालं. एका फ्रस्टेड बापाचं भाषण झालं. त्यांनी जर मुलाला घरीच चांगले संस्कार दिले असते तर गांजावाल्यांच्या प्रकरणात आणि मुलींच्या प्रकरणात त्यांचं नाव आलंच नसतं. त्यांना योग्य संस्कार दिले असते तर ते चिडले नसते. त्यांना त्रास थोडा कमी झाला असता, असा चिमटा नितेश राणे यांनी काढला.

सुशांतसिंहप्रकरण आणि दिशा सालियनप्रकरण सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. बिहारच्या महाधिवक्त्याने कोर्टात आदित्य ठाकरेंचं नाव घेतलेलं आहे. असं असताना मुख्यमंत्री मुलाला क्लीन चिट देत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे, असंही ते म्हणाले. एवढीच खुमखुमी असेल तर दिशा सालियन प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करा. पोलिसांना खुला तपास करू द्या. 8 तारखेला काय झालं? तिथे कोण होतं? मोबाइल टॉवरचं लोकेशन काय होतं? सर्वांना कळू द्या. हे सगळं बाहेर आले तर क्लीन चिट सोडा, कोणाकोणाला जेलची हवा खावी लागेल ना त्याच्या ब्रेकिंग बातम्या बनतील, असा दावाही त्यांनी केला.

दाल में कुछ काला है

खरे तर सुशांतसिंह राजपूतप्रकरण असो की दिशा सालियनप्रकरण असो. आम्ही कुणीही आदित्य ठाकरेंचं नावा घेतलं नव्हतं. त्यावर आदित्य ठाकरेंनी स्वत: पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं. आता त्यांच्या वडिलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. याचाच अर्थ दाल में कुछ काला है हे स्पष्ट होतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

श्रावणबाळ आदित्य दिनोच्या घरी तुळशीपूजेला जातो का

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाला क्लीन चीट देत बसू नये. तुमचा मुलगा श्रावण बाळ आहे म्हणूच तो दिनोच्या घरी संध्याकाळी तुळशी पूजा करायला जातो का? दूधाने धुतलेला नाही तो, असा चिमटा काढतानाच महाराष्ट्राची बदनामी आम्ही केलेली नाही. विरोधी पक्षानेही केलेली नाही. महाराष्ट्राची बदनामी कुणी केली असेल तर या श्रावण बाळानेच केली आहे. त्याच्या रात्रीच्या धंद्यांवर कंट्रोल ठेवला असता तर आज हे घडलंच नसतं. सुशांतसिंह-दिशा सालींयनचा जीव गेलाच नसता… कंगना रनौतचं ऑफिस तोडायला लागलं नसतं. , असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला. (nitesh rane attacks cm uddhav thackeray)

नितेश राणेंचा हल्लाबोल

  • मुंबई पोलीस फक्त त्यांची नाही तर आमचीसुद्धा आहे. आज ते मुख्यमंत्री आहेत पण उद्या ते असतील का ? सरकार गेलं तरी पुरावे राहतील ना.
  • बाळासाहेब राहायचे त्या ‘मातोश्री’च्या बाहेर तुळशीचेच वृंदावन. पण संध्याकाळी त्यांचा कारटा ज्या डिनोच्या घरी जातो त्याच्या घराबाहेर काय आहे?
  • त्यांना सरकार पडण्याची घाई लागली असेल. आम्हाला नाही. आम्हाला चिंता ही राज्यातल्या शेतकऱ्यांची आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावाची आहे. विविध समाजाची तरुण मुले चिंतेत आहे. त्यावर भाजपचे लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी चिडचिड करण्यापेक्षा स्वतःच्या घरावर लक्ष द्यावं.
  • काल जी खुमखुमी फुगलेली दिसली त्याला कधी व कशी टाचणी लावायची त्यासाठी आमच्या नेत्यांचे आदेश येऊ देत. टाचणीला तेल लावून ठेवलं आहे. त्याची ब्रेकिंग बातमी तुमच्याकडे होईल.

संबंधित बातम्या:

महाआघाडीचं सरकार लवकरच पडणार हे शरद पवारही जाणून: निलेश राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार?

सावरकर हे आमचे हिंदुत्वाचे मार्गदर्शकच; शिवसेना कधीही गप्प बसणार नाही…

(nitesh rane attacks cm uddhav thackeray)

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.