Nanded : नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा शिवसेनेकडून समाचार, ‘चायना आयटम’ म्हणूनच हिणवले

शिवसेनेला हिंदूत्वाचा विसर पडल्याचा आरोप सातत्याने भाजपाकडून केला जात आहे. शिवाय खरे हिंदूत्व हे भाजप पक्ष जोपासत असल्याचे वारंवार दाखवून देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाच्या एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी तर हिंदुहृदयसम्राट म्हणून चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख केला. गेल्या काही दिवसांमधील देवेंद्र फडणवीस यांचे कार्य पाहिले तर तेच खरे हिंदुहृदयसम्राट असेही राणे म्हणाले होते.

Nanded : नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याचा शिवसेनेकडून समाचार, 'चायना आयटम' म्हणूनच हिणवले
नांदेड शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 2:34 PM

नांदेड : (Balasaheb Thackeray) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम ठेवण्यासाठी बंड करुन भाजपशी युती केल्याचे शिंदे गटाच्या आमदारांनी कायम सांगितले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट अशीच सर्वांची भावना असताना आता (Nitesh Rane) नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख हा हिंदुहृदयसम्राट म्हणून केला आहे. त्यावरुन नितेश राणे हे टीकेचे धनी ठरत आहे. नांदेड येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यातही नितेश राणे यांच्या त्या वक्तव्यावरुन टीकेचे बाण सोडण्यात आले. (Nanded) शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी तर नितेश राणे म्हणजे ‘चायना आयटम’ असल्याचेच सांगितले. त्यामुळे शिवसेना भाजप यांच्यातील मतभेद हे दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात आहे.

नेमका प्रकार काय ?

शिवसेनेला हिंदूत्वाचा विसर पडल्याचा आरोप सातत्याने भाजपाकडून केला जात आहे. शिवाय खरे हिंदूत्व हे भाजप पक्ष जोपासत असल्याचे वारंवार दाखवून देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाच्या एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी तर हिंदुहृदयसम्राट म्हणून चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख केला. गेल्या काही दिवसांमधील देवेंद्र फडणवीस यांचे कार्य पाहिले तर तेच खरे हिंदुहृदयसम्राट असेही राणे म्हणाले होते.

शिवसेनेनेच मुंबईचे हित जोपासले

सध्याचे राजकारण केवळ मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केले जात आहे. पण गेल्या 25 वर्षापासून शिवसैनिकच मुंबईच्या हितासाठी रात्रीचा दिवस करीत आहे. त्यामुळे मुंबईकर आणि शिवसेना हे वेगळे नाते आहे. कुणीही ते तोडण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला आपले हित कशामध्ये आहे, याची जाणीव असल्याचे बबन थोरात यांनी सांगितले. तर मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवाच फडणार असल्याचेही ते म्हणाले.

एकच नारा, गद्दारांना धडा

पक्ष संघटन आणि कठीण परस्थितीमध्ये मजबूतीकरण यासाठी शिवसेनेकडून स्थानिक पातळीवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याअनुषंगानेच नांदेडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आहे. मेळाव्यात गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा सल्लाच थोरात यांनी दिला आहे. शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांचा उल्लेख हा गद्दार म्हणून केला जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.