गडकरी वि. पटोले : नागपूर मतदारसंघात जातीची समीकरणं काय आहेत?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघाची लढाई चुरशीची असली, तरी यावेळच्या लढाईत जातीची समीकरणंही पुढे येण्याची शक्यता आहे. गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस जातीच्या समीकरणांचा वापर करु शकते. नागपूरला कुणी संघभूमी, तर कुणी दीक्षाभूमी म्हणून ओळखतं. मात्र नागपुरात मुस्लिम मतांचा आकडा सुद्धा मोठा आहे. शिवाय, ओबीसी सुद्धा कमी नाहीत. त्यामुळे इथे जातीय समीकरणाला सुद्धा तेवढेच महत्व आहे. नागपुरात […]

गडकरी वि. पटोले : नागपूर मतदारसंघात जातीची समीकरणं काय आहेत?
Follow us on

नागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघाची लढाई चुरशीची असली, तरी यावेळच्या लढाईत जातीची समीकरणंही पुढे येण्याची शक्यता आहे. गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस जातीच्या समीकरणांचा वापर करु शकते.

नागपूरला कुणी संघभूमी, तर कुणी दीक्षाभूमी म्हणून ओळखतं. मात्र नागपुरात मुस्लिम मतांचा आकडा सुद्धा मोठा आहे. शिवाय, ओबीसी सुद्धा कमी नाहीत. त्यामुळे इथे जातीय समीकरणाला सुद्धा तेवढेच महत्व आहे.

नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासदार आहे. यंदाही ते भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.. काँग्रेसने नाना पटोले यांच्या रुपाने ओबीसी चेहरा मैदानात उतरवला आहे. तर वंचित आघाडी, बसपा सुद्धा मैदानात आहे.  गेल्या निवडणुकीचा विचार केला, तर भाजप विरुद्ध काँग्रेस असा मुकाबला होता, तर तिसऱ्या क्रमांकावर बसपा होती.

गडकरी आपल्या भाषणातून मी जातीपातीचा राजकारण करत नाही तर विकासाचं राजकारण करतो. आपल्या कामाला महत्व देतो. विरोधकांचं सुद्धा काम करतो, असं सांगतात

नागपूर लोकसभा मतदारसंघातील चित्र :

  • नागपूर शहरात 21 लाख 26 हजार 574 मतदार
  • महिला मतदार – 10 लाख 45 हजार 934
  • पुरुष मतदार – 10 लाख 84 हजार 574
  • दलित, मुस्लिम आणि कुणबी मतदार – सुमारे 12 लाख
  • हलबा समाज – 60 ते 70 समाज हजार

नागपूर शहरात ओबीसींची संख्या लाखाच्या वर आहे. हलबा समाजाची संख्या सुद्धा निर्णायक भूमिका निभवणारी म्हणजे 60 ते 70 हजार आहे, मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे. हेच हेरत काँग्रेसने नाना पटोले यांच्या रुपाने रणांगणात ओबीसी चेहरा उतरवला आहे. नागपुरात सगळ्यात मोठी संख्या कुणबी आणि तेली समाजाची आहे. याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. मात्र काँग्रेसचे उमेदवार आपण जातीचं राजकारण करत नाही असं सांगतात. मात्र सोबतच आपण बहुजन समाजातून आलो असून त्यांच्या हितासाठी काम करत आहोत असेही म्हणत आहेत.

नागपूरच्या रिंगणात वंचित आघाडीचा उमेदवार मुस्लिम आणि दलितांसोबतच ओबीसीची मत सुद्धा विभागली जाऊ शकते. दलित मतांचा मोठा गट्टा आहे, त्यात मागच्या निवडणुकीचा विचार केला तर बसपा तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे त्यांचा ठरलेला मतदार आहे. अशातच जातीच्या राजकारणाचा परिणाम झाला तर मतांची विभागणी होऊ शकते. मात्र गडकरी यांचा विचार केला तर त्याना मानणारा वर्ग सगळ्याच समाजात असल्याने आणि त्यांचं राजकारण हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त सोबतच त्यांनी शहराचा केलेला विकास पाहता शिक्षित झालेली आणि विकासासा महत्व देणारी जनता विकासाच्या बाजूने मतदान करेल की जातीचा आधार घेईल, हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.