NMC Election 2022, Ward (36) : प्रभाग क्रमांक 36 मध्ये चारही जागांवर भाजपाचा विजय; यंदाही भाजपा विजयाचा गुलाल उधळणार!
नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 36 मध्ये गेल्या निवडणुकीत चारही जागांवर भाजपाने (BJP) विजय मिळवला होता. या प्रभागामध्ये धरमपेठ, गिरीपेठ, रामदासपेठ, गाडगा, लेंड्रा पार्क, शिवाजीनगर, शंकरनगर, हिलटॉप, सुदामनगर, सुदामनगरी, खदान, यशवंतनगर, गांधीनगर या भागांचा समावेश होतो.

नागपूर : मुंबईसह (Mumbai) राज्याच्या काही प्रमुख महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये नागपूर (Nagpur) महापालिकेचा देखील समावेश आहे. 2017 ला झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप (BJP) प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला. नागपूर महापालिकेत बसपाने दहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेला मागे टाकले शिवसेनेच्या वाट्याला गेल्यावेळी अवघ्या दोन तर राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा आली होती. नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 36 बाबत बोलायचे झाल्यास गेल्या निवडणुकीत चारही जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. प्रभाग क्रमांक 36 अ मधून भाजपाच्या मिनाक्षी तेलगोटे या विजयी झाल्या होत्या, प्रभाग क्रमांक 36 ब मधून भाजपाच्या पल्लवी श्यामकुळे या विजयी झाल्या होत्या,प्रभाग क्रमांक 36 क मधून भाजपाचे उमेदवार लहू बेहते हे विजयी झाले होते. तर प्रभाग क्रमांक 36 ड मधून भाजपाचे उमेदवार प्रकाश सिताराम भोयर हे विजयी झाले होते.
प्रभाग क्रमांक 36 मधील महत्त्वाचे भाग
प्रभाग क्रमांक 36 मध्ये धरमपेठ, गिरीपेठ, रामदासपेठ, गाडगा, लेंड्रा पार्क, शिवाजीनगर, शंकरनगर, हिलटॉप, सुदामनगर, सुदामनगरी, खदान, यशवंतनगर, गांधीनगर, धरमपेठ एक्स, खरे टाऊन, डॉ. आंबेडकर नगर, काचीपूरा, रामनगर, वर्मा लेआऊट या प्रमुख भागांचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक 36 ची एकूण लोकसंख्या
प्रभाग क्रमांक 36 मध्ये एकूण लोकसंख्या ही 49994 एवढी आहे. एकून लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 7856 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3081 एवढी आहे.
2017 मधील चित्र काय?
प्रभाग क्रमांक 35 प्रमाणेच प्रभाग क्रमांक 36 देखील भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. गेल्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून चारही जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते.प्रभाग क्रमांक 36 अ मधून भाजपाच्या मिनाक्षी तेलगोटे या विजयी झाल्या होत्या, प्रभाग क्रमांक 36 ब मधून भाजपाच्या पल्लवी श्यामकुळे या विजयी झाल्या होत्या,प्रभाग क्रमांक 36 क मधून भाजपाचे उमेदवार लहू बेहते हे विजयी झाले होते. तर प्रभाग क्रमांक 36 ड मधून भाजपाचे उमेदवार प्रकाश सिताराम भोयर हे विजयी झाले होते.
यंदा प्रभागाचे आरक्षण कसे?
महापालिका निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेल्या आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक 36 अ हा अनुसूचित जातीसाठी, प्रभाग क्रमांक 36 ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 36 क सर्वसाधार प्रवर्गासाठी असे आरक्षणाचे स्वरूप आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 36 अ
| पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर |
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 36 ब
| पक्ष | उमदेवार | विजयी/आघाडी |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर |
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 36 क
| पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर |
2017 मधील पक्षीय बलाबल काय?
2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत नागपूरमध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती.भाजपाने तब्बल 108 जागांवर विजय मिळवला होता. भाजपानंतर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होते. नागपुरात काँग्रेसच्या एकूण 28 जागा आल्या होत्या तर बसपाचे 10 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा विजय झाला.
