AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMMC Election 2022, Ward (1) : प्रभाग क्रमांक 1, भाजपाचा विजय निश्चित?

NMMC Election 2022 : नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये दिघा भोला नगर, ईश्वर नगर, आनंद नगर, मुकूंद कंपनी, बाली नगर, फुले नगर, सावित्री नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

NMMC Election 2022, Ward (1) : प्रभाग क्रमांक 1, भाजपाचा विजय निश्चित?
| Updated on: Aug 04, 2022 | 2:20 AM
Share

नवी मुंबई : राज्याच्या विविध शहरांमधील महापालिका निवडणुकीचे (Municipal election 2022) बिगूल वाजले आहे. यामध्ये नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिकेचा देखील समावेश आहे. नवी मुंबई महापालिकेत एकूण 122 नगरसेवक असून एकूण 41 प्रभाग आहेत. गेल्यावेळी नवी मुंबई महापालिकेत भाजपाने (BJP) बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक एकबाबत बोलायचे झाल्यास प्रभाग क्रमांक एकमध्ये दिघा भोला नगर, ईश्वर नगर, आनंद नगर, मुकूंद कंपनी, बाली नगर, फुले नगर, सावित्री नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो. यंदा देखील नवी मुंबई महापालिकेत भाजपाच बाजी मारण्याची शक्यता अधिक आहे, तर शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसू शकतो. नवी मुंबईतील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तसेच आजी, माजी नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी आणखी सोपी बनली आहे.या वार्डामधून गेल्यावेळी उज्वला विकास झांजड या विजयी झाल्या होत्या.

प्रभाग क्रमांक 1 मधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक 1 मध्ये दिघा भोला नगर, ईश्वर नगर, आनंद नगर, मुकूंद कंपनी, बाली नगर, फुले नगर, सावित्री नगर, विष्णू नगर, विजय नगर, राम नगर, गणपती पाडा या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 1 ची लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक एकची एकूण लोकसंख्या ही 25179 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 2408 इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 397 इतकी आहे.

2017 मधील चित्र काय?

या प्रभागात उज्वला विकास झांजड या विजयी झाल्या होत्या.गेल्यावेळी नवी मुंबई महापालिकेत भाजपाने बाजी मारली होती.यंदा देखील भाजप निवडणुकीत विजयाच्या उद्देशाने उतरणार आहे. मात्र दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरण्याचे चित्र आहे.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक एक अ हा सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक एक ब हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. तर प्रभाग क्रमांक एक क हा विनारक्षित आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 अ

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 ब

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 क

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या वेळी नवी मुंबई महापालिकेत भाजपाने बाजी मारली होती. शिवसेनेला मात दिली होती. यावेळी देखील नवी मुंबई महापालिकेत भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. राजकीय तज्ज्ञांकडून तसा अंदाज वर्तवला जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शिवसेनेत पडलेली फूट हे आहे. ही फूट नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.