AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणूक : आज कुणा-कुणाचे उमेदवारी अर्ज दाखल?

Loksabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 11 एप्रिल आणि 18 एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान आहे, त्यासाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात अर्ज भरण्याची लगबग पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा अर्ज दाखल काँग्रेसचे […]

लोकसभा निवडणूक : आज कुणा-कुणाचे उमेदवारी अर्ज दाखल?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

Loksabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 11 एप्रिल आणि 18 एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान आहे, त्यासाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात अर्ज भरण्याची लगबग पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा अर्ज दाखल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणांनी नांदेडमधून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आमदार अमिता चव्हाणही उपस्थित होत्या. अर्ज भरल्यानंतर अशोक चव्हाण रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. नांदेडमधून भाजपने अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक यशपाल भिंगे रिंगणात आहेत.

नागपुरातून गडकरींचा अर्ज दाखल

नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बानवकुळे उपस्थित होते. भव्य रॅली काढून गडकरींनी उमेदवारी अर्ज भरला.

गडचिरोलीतून भाजचे उमेदवार अशोक नेतेंचा अर्ज दाखल

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी शक्तिप्रदर्शन करत, उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

बुलडाण्यात अर्ज दाखल

शिवसेना-भाजप युतीकडून प्रतापराव जाधव यांनी अर्ज भरला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज भरला.

ओमराजे निंबाळकरांचा अर्ज दाखल

शिवसेना-भाजपचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उस्मानाबादमधून अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी पालकमंत्री अर्जुनराव खोतकर, भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर, संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांची उपस्थिती होती.

सोलापुरात दिग्गजांचे अर्ज दाखल

सोलापूर मतदार संघातून लोकसभेसाठी महाआघाडीतर्फे काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि सेना-भाजप महायुतीतर्फे भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य या तिन्ही प्रबळ दावेदारांचे उमेदवारी अर्ज दाखल

अमरावतीतून अडसूळांसह इतर उमेदवारांचे अर्ज दाखल

शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे आणि बहुजन समाज पार्टीचे अरुण वानखेडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

माणिकराव ठाकरेंचा अर्ज दाखल

यवतमाळमधून काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला. तसेच, युतीच्या भावना गवळी, प्रहारच्या वैशाली येडे यांनीही अर्ज दाखल केला. भाजप नेते पी. बी. आडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली