संकटमोचक गिरीश महाजन पुन्हा हिरो, उत्तर महाराष्ट्रात लाखोंच्या फरकाने क्लीन स्विप

नाशिक : लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात दणदणीत यश मिळालं. या यशाचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात असलं तरी मॅन ऑफ द मॅच मात्र सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन ठरल्याचं बोललं जातंय. उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागा मोठ्या फरकाने निवडून आणण्याचा करिष्मा गिरीश महाजन यांनी करुन दाखवला. त्यामुळे सहाजिकच राज्यात आणि केंद्रातही गिरीश […]

संकटमोचक गिरीश महाजन पुन्हा हिरो, उत्तर महाराष्ट्रात लाखोंच्या फरकाने क्लीन स्विप
Follow us
| Updated on: May 24, 2019 | 5:12 PM

नाशिक : लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात दणदणीत यश मिळालं. या यशाचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात असलं तरी मॅन ऑफ द मॅच मात्र सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन ठरल्याचं बोललं जातंय. उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागा मोठ्या फरकाने निवडून आणण्याचा करिष्मा गिरीश महाजन यांनी करुन दाखवला. त्यामुळे सहाजिकच राज्यात आणि केंद्रातही गिरीश महाजन यांचं वजन आणखी वाढलं आहे.

उत्तर महाराष्ट्रतल्या नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, रावेर, नंदुरबार, शिर्डी आणि नगर या सगळ्या जागांची जबाबदारी गिरीश महाजन यांनी घेतली होती. यापैकी दिंडोरी, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जागांबाबत संभ्रम होता, मात्र आठही जागा मोठ्या फरकाने निवडून येतील असा महाजनांनी केलेला दावा खरा ठरला. एकीकडे राज्यातला निकालांमुळे मुख्यमंत्र्यांची देशात वाहवा झालेली असताना त्यापाठोपाठ वजन वाढलं ते गिरीश महाजनांचं.

उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचा विभागवार विचार केला तर लक्षात येईल की लाखांच्या फरकानेच सगळ्या जागा विजयी झाल्या आहेत.

मतदारसंघनिहाय जागा आणि मतांचा फरक

दिंडोरी

भाजप – भारती पवार – 567098

राष्ट्रवादी – धनराज महाले – 368287

दोघांमधला फरक – 198811

नाशिक

शिवसेना – हेमंत गोडसे – 561812

राष्ट्रवादी – समीर भुजबळ – 270731

दोघांमधला फरक – 291081

धुळे

भाजप – सुभाष भामरे – 613533

काँग्रेस – कुणाल पाटील – 384290

दोघांमधला फरक – 229243

अगमदनगर

भाजप – सुजय विखे पाटील – 696961

राष्ट्रवादी – संग्राम जगताप – 419364

दोघांमधला फरक – 277597

नंदुरबार

भाजप – हिना गावित – 639136

काँग्रेस – के सी पाडवी – 543507

दोघांमधला फरक – 95629

रावेर

भाजप – रक्षा खडसे – 655386

राष्ट्रवादी – उल्हास पाटील – 319504

दोघांमधला फरक – 335882

जळगाव

भाजप – उन्मेश पाटील – 713874

राष्ट्रवादी – गुलाबराव देवकर – 302257

दोघांमधला फरक – 411617

गिरीश महाजन यांनी जबाबदारी घेतलेल्या उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागांवर उमेदवारांनी लाखांच्या घरात आघाडी घेतली, मात्र गिरीश महाजनांचं होम पिच असलेल्या जळगावमध्ये उन्मेश पाटील यांनी विक्रमी 4 लाखांच्या आघाडीने विरोधकाला पराभूत केलं.

राज्य सरकारच्या प्रत्येक अडचणीच्या काळात संकटमोचक म्हणून गिरीश महाजन धावून आले. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी नेमका कल काय असेस हे सांगणं कोणालाही जमत नसताना महाजन यांनी मात्र राज्यात 40 पार करु आणि उत्तर महाराष्ट्रात आठही जागा जिंकू असा दावा केला आणि तो खरा करुन दाखवला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात तर गिरीश महाजन यांचं वजन वाढलंच आहे. मात्र दिल्ली दरबारीही त्यांनी आपला करिष्मा दाखवून दिल्याची चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.