अजित पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हवं ते देतात, आम्हाला मिळत नाही, आता शिवसेना मंत्र्यांची कुरबुर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. (Now Shiv Sena Ministers Upset)

अजित पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हवं ते देतात, आम्हाला मिळत नाही, आता शिवसेना मंत्र्यांची कुरबुर!
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 11:31 AM

मुंबई : महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीची कुरबुरी सुरु असताना आता सत्ताधाऱ्यांमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनीही आपली कुरबुरी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. (Now Shiv Sena Ministers Upset)

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना आढावा बैठक असल्याचं म्हटलं होतं. कोरोनाविरोधातील लढा आणि नियमित आढावा याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली होती. मात्र टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सेनेच्या मंत्र्यांनी तक्रारीचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. (Shiv Sena Ministers complaints to CM)

शिवसेना मंत्र्यांचा तक्रारी

  • राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आमच्या जिल्ह्यातील विकास कामे होत नाहीत.
  • आवश्यक असलेले अधिकारी बदलून मिळत नाहीत.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री जिथे आहेत तिथे त्यांना हवे असलेले जिल्हाधिकारी आणि महत्वाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होते.
  • काँग्रेस-NCP मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांसबंधी कामे गतीने होत नाहीत.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात बसून त्यांच्या पक्षाच्या पालकमंत्र्यांना आवश्यक असलेल्या कामांचा निपटारा करतात. त्यांच्या पालकमंत्र्यांना आवश्यक जिल्हाधिकारी- इतर अनेक अधिकारी झटपट बदलून मिळतात. मात्र आमच्याबाबतीत तसे होत नाही.
  • काही मंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता यांच्याविरोधातही नाराजी व्यक्त केली
  • मुख्य सचिवपदी असताना गेल्या 6 महिन्यात अजोय मेहता यांनी आम्हाला हवा असलेला एकही जिल्हाधिकारी-सनदी अधिकारी बदलून दिला नाही.
  • मेहता संघटनेशी संबंधित नसताना त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात ठेवण्या मागचे कारण काय आहे ?
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्र्यांना स्पष्टीकरण- प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यानेच मी अजोय मेहता यांना मुख्यमंत्री कार्यालयात ठेवले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे काम चांगले चालले आहे.
  • शिवसेनेच्या मंत्र्यांना आवश्यक असलेल्या कामांनाही आता गती देणार.

(Now Shiv Sena Ministers Upset)

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना काय सांगितलं? एकनाथ शिंदे म्हणतात…. 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.