AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल; शिंदे गटात सहभागी?

शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे नॉट रिचेबल झाले आहेत. भास्कर जाधव हे कालपर्यंत शिवसेनेसोबत होते. मात्र आता भास्कर जाधव यांचा फोन लागत नसल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भास्कर जाधव हे देखील शिंदे गटात सहभागी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra politics : आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल; शिंदे गटात सहभागी?
भास्कर जाधव रस्त्यांची दुImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 24, 2022 | 7:52 AM
Share

शिवसेनेला (shivsena) आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे नॉट रिचेबल झाले आहेत. भास्कर जाधव हे कालपर्यंत शिवसेनेसोबत होते. मात्र आता भास्कर जाधव यांचा फोन लागत नसल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भास्कर जाधव हे देखील शिंदे गटात सहभागी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सध्या अपक्ष आमदार धरून एकूण 49 आमदारांचा पाठिंबा आहे. तर शिवसेनेकडे भास्कर जाधव यांच्यासह काल केवळ 15 आमदार होते. मात्र आता भास्कर जाधव यांचा देखील फोन लागत नाही. ते नॉटरिचेबल आहेत. भास्कर जाधव देखील शिंदे गटात सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही.

शिंदे गटातील आमदारांच्या संख्येत वाढ

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला गळती सुरूच आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आता अपक्ष आमदारांसह एकूण 49 आमदार सहभागी झाले आहेत. या सर्व आमदारांना आसाममध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांना आसाममध्ये ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे, त्या हॉटलभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमदारांची संख्या कमी होत असल्याने शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. महाविकास आघाडी सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत.

शरद पवारांचा भाजपावर निशाणा

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, या आमदारांना कोण मदत करत आहे. हे आमदार सुरतवरून आसामला कसे पोहोचले. त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणी मदत केली, हे सर्वांना माहीत आहे. मला त्यांचे नाव घ्यायची गरज वाटत नाही, असे म्हणत त्यांनी भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर दुसरीकडे अजित पवार यांनी या प्रकरणात गृहविभाग आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात एवढी मोठी घडामोड घडते, याची साधी भनक देखील पोलिसांना कशी काय लागली नाही असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.