Shiv Sena Symbol : आता शिवसेना शिंदेंची : इंदिरा गांधी, मुलायम सिंह यांनी गमावले होते निवडणूक चिन्ह अन् पक्ष

केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. परंतु निवडणूक आयोगाचा असा हा पहिलाच निर्णय नाही. यापुर्वी असे निर्णय लागले होते.

Shiv Sena Symbol : आता शिवसेना शिंदेंची : इंदिरा गांधी, मुलायम सिंह यांनी गमावले होते निवडणूक चिन्ह अन् पक्ष
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 8:28 AM

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश शुक्रवारी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका आहे. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. परंतु निवडणूक आयोगाचा असा हा पहिलाच निर्णय नाही. यापुर्वी इंदिरा गांधी व मुलायम सिंह यादव यांनाही पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले होते.

काय आहे इतिहास

हे सुद्धा वाचा

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे चिन्ह बैलगाडी होते. 1952, 1957 व 1962 या तीन निवडणूका या चिन्हाखाली लढल्या गेल्या होत्या. नेहरु यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनीही बैलगाडी चिन्हावर निवडणूक जिंकून सरकार बनवले होते. शास्त्रीजी यांच्या निधनानंतर काँग्रेसची सूत्र इंदिरा गांधी यांच्यांकडे आली. परंतु इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात असंतोष निर्माण झाला. वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस (आर) पक्ष बनवला. बैलजोडी चिन्हावर वरिष्ठ नेत्यांनी दावा केला. मग निवडणूक आयोगात हे प्रकरण चालले. आयोगाने इंदिरा गांधी यांना बैलजोडी चिन्ह दिले नाही. इंदिरा गांधी यांनी गाय वासरु चिन्ह घेतले.

इंदिरा गांधी यांनी दोन वेळा चिन्ह घेतले

१९७१ ची निवडणूक गाय वासरु चिन्हावर इंदिरा गांधी यांनी जिंकली. त्यानंतर १९७५ मध्ये पुन्हा परिस्थिती बदलली. देशात आणीबाणी लागू झाली. १९७७ मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पुन्हा नवीन पक्ष बनवला. त्याला काँग्रेस (आय) नाव दिले. यावेळी इंदिरा गांधी यांनी पंजा चिन्ह निवडले.दोन वेळा इंदिरा गांधी यांनी चिन्ह बदलले.

समाजवादी पक्षासोबत काय झाले

४ ऑक्टोंबर १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाली. १९९३ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सायकल हे चिन्ह समाजवादी पक्षाने घेतले. या चिन्हावर निवडणुका जिंकून मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले. २०१६ मध्ये मुलायम सिंह यादव यांचा मुलगा अखिलेश यादव पक्षातून बाहेर पडला. त्याने आपलाच पक्ष समाजवादी पक्ष असल्याचा दावा केला. यासंदर्भात १७ जानेवारी २०१७ रोजी निवडणूक आयोगाने निर्णय दिला. आयोगाने मुलायम सिंह यादव यांना पक्ष व चिन्ह दिले नाही. अखिलेश यादव यांना पक्ष व चिन्ह दिले.

महाराष्ट्रात काय झाले

महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती.

एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.

Non Stop LIVE Update
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं..
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं...
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार.
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल.