AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना सल्ला..! काय आहेत तीन महत्वाच्या गोष्टी?

आतापर्यंत शिवसेना फोडण्याचा सातत्याने प्रयत्न झाला पण यामधून पक्षाने अधिक उभारी घेतली आहे. यावेळी मात्र, पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भाजपा अध्यक्षांनी त्याबाबत बोलूनही दाखवले आहे. पण शिवसेना अशी आव्हानं पायदळी तुडवत शिवसेनेने त्यावर झेंडा रोवणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा लढा हा उभारावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Uddhav Thackeray : न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना सल्ला..! काय आहेत तीन महत्वाच्या गोष्टी?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2022 | 2:21 PM
Share

मुंबई : एकीकडे शिवसेनेने 16 आमदारांबद्दल दाखल केलेल्या (Hearing on petition) याचिकेवर सुनावणी होत होती तर दुसरीकडे (Uddhav Thackeray) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत होते. आतापर्यंत शिवसेना फोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण आता शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी तसे बोलूनही दाखवलं आहे. मात्र, अशी आव्हानं पायदळी तुडवत (Shiv Sena) शिवसेनेने त्यावर झेंडा रोवला हा इतिहास आहे. त्यामुळे न्यायालयीन लढ्यावर माझा विश्वास आहे असे म्हणत शिवसैनिकांनी स्थानिक पातळीवर शपथपत्र आणि सदस्य नोंदणीवर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. सध्या पक्षाची तीन पातळीवर लढाई सुरु असून त्यामध्ये विजय नक्की आपलाच होणार असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

सध्या तीन पातळीवरची पक्षाची लढाई

शिवसेना पक्ष अडचणीत असला तरी सध्या तीन पातळीवर त्याची लढाई ही सुरु आहे. एकतर रस्त्यावरच्या लढाईत शिवसैनिक कधीच हारणार नाही. त्या लढाईची आपल्याला चिंताही नाही. कारण शिवसेनेची स्टाईल ही सर्वांनाच माहिती आहे. शिवाय त्याचा प्रत्ययही येत असल्याचे म्हणत त्यांनी काल उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा अस्पष्ट उल्लेखही केलाच. पण दुसरी लढाई ही शिवसैनिक आणि पक्षासाठी महत्वाची आहे. या न्यायालयीन लढ्यामध्येही आपण ताकदीने लढत आहोत. न्यायदेवतेवर विश्वास असून लोकशाहीला समर्पक असाच निकाल अपेक्षित असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तर तिसरी लढाई ही स्थानिक पातळीवरची आहे. स्थानिक पातळीवरुन शिवसैनिकांनी शपथपत्र आणि सदस्य नोंदणीवर भर देण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. रस्त्यावर, न्यायालयीन लञढाई, स्थानिक पातळीवरील लढाई

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न

आतापर्यंत शिवसेना फोडण्याचा सातत्याने प्रयत्न झाला पण यामधून पक्षाने अधिक उभारी घेतली आहे. यावेळी मात्र, पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भाजपा अध्यक्षांनी त्याबाबत बोलूनही दाखवले आहे. पण शिवसेना अशी आव्हानं पायदळी तुडवत शिवसेनेने त्यावर झेंडा रोवणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा लढा हा उभारावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवसेना केवळ पक्ष नसून एक संघटन आणि शिवसैनिकांचे कुटुंब आहे. त्यामुळे विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठऱणार यामध्ये शंका नसल्याचेही ठाकरे म्हणाले आहेत.

राजकारणामध्ये हार-जीत ही असतेच

राजकारणमध्ये हार-जीत ही आलीच. सध्या आपल्या पाठीत खंजीर खुपसला असला तरी त्याच जिद्दीने पुन्हा उभारी हा शिवसैनिक घेणार आहे. पण पक्षाच्या बाबतीत वेगळेच राजकारण खेळले जात आहे. पक्ष संपवण्यासाठी अटोकाटचे प्रयत्न सुरु आहेत. पण न्यायदेवतेवर आणि शिवसैनिकांच्या श्रध्देवर विश्वास असल्याने हे आव्हानही आपण पायदळी तुडवू असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.