रोहित पवारांना थेट आव्हान, राम शिंदेंची सूत्र सुजय विखेंनी हाती घेतली

दुसऱ्यांच्या नातवाचे लाड मी का पुरवावे, असं वक्तव्य त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. पण यावेळी आता पवारांचा नातू रोहित पवार (Sujay Vikhe Rohit Pawar) कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवत आहे.

रोहित पवारांना थेट आव्हान, राम शिंदेंची सूत्र सुजय विखेंनी हाती घेतली

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध विखे असा संघर्ष चांगलाच गाजला. या संघर्षामुळे काँग्रेसमध्ये असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे (Sujay Vikhe Rohit Pawar) यांना भाजपात जावं लागलं. या संघर्षात अखेर सुजय विखेंनी बाजी मारली. दुसऱ्यांच्या नातवाचे लाड मी का पुरवावे, असं वक्तव्य त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. पण यावेळी आता पवारांचा नातू रोहित पवार (Sujay Vikhe Rohit Pawar) कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सुजय विखेंनी नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 जागा जिंकण्याचा विडा उचललाय.

दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटलांपासून ते नातू सुजय विखे यांच्यापर्यंत पवार विरुद्ध विखे वाद सुरुच आहे. हा जुना वाद पवारही विसरले नाही आणि विखेंच्याही मनात हा वाद आहे. मी दुसऱ्यांच्या नातवांचे (Sujay Vikhe Rohit Pawar) लाड का पुरवू’ हे लोकसभा निवडणुकीतील शरद पवार यांचं विधान राज्यात गाजलं. या विधानातून पवारांनी दिवंगत बाळासाहेब विखे यांचे नातू सुजय यांना जाहीरपणे राजकीय विरोध केला. आता पवारांचे नातू रोहित यांना रोखण्यासाठी खासदार सुजय विखे मैदानात उतरले आहेत.

रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या मतदारसंघातून इच्छुक आहेत. गावोगावी भेटी देऊन ते मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांचे आगमन झाल्याने राष्ट्रवादीतील सर्व स्थानिक इच्छुकांनी आपला उमेदवारीचा दावा मागे घेतला. त्यांची लढत मंत्री राम शिंदे (Sujay Vikhe Rohit Pawar) यांच्याशी आहे. या मतदारसंघावर अनेक वर्षांपासून भाजपची पकड आहे. फडणवीस सरकारच्या काळात शिंदे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणला. स्थानिक नेत्यांना त्यांनी दोन वेळा पराभवाची धूळ चारली. त्यांना रोखायचे असेल तर एकास एक उमेदवार देण्याची रणनिती यावेळी राष्ट्रवादी अवलंबत आहे. मात्र ती किती यशस्वी होईल याबाबत राजकीय विश्लेषक शंका व्यक्त करतात.

सध्या खासदार डॉ. सुजय विखेंनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार करायचा विडाच उचललाय. कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी उमेदवारी नाकारलेली विखे विसरलेले नाहीत. नगर जिल्ह्यात 12 जागांवर भाजप-शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा पण विखेंनी केलाय.

या विधानसभेला जिल्ह्यात 12-0 करणार असा विश्वास विखेंनी व्यक्त केलाय. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्याच पालकमंत्री राम शिंदेंच्या विरोधात शरद पवारांचे नातू रोहित पवार (Sujay Vikhe Rohit Pawar) उभे असल्याने आता विखेंनीही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे याही निवडणुकीत पवार विरुद्ध विखे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुक्त जिल्हा करण्याचा निर्धारच सुजय विखेंनी केलाय. लोकसभा निवडणुकीत पवारांनी सुजय विखेंसाठी नगरची जागा सोडली नाही. कारण, बाळासाहेब विखेंपासून पवार वि. विखे असा वाद महाराष्ट्राने पहिला. त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला, आता त्याचा बदला घेण्यासाठी सुजय विखेंनी जिल्ह्यात दौरे सुरू केले आहेत. त्यात पवारांच्या विरुद्ध त्यांनी प्रचार सुरू केलाय.

कर्जत-जामखेडमधील स्थानिक विरोधकांत एकजूट होत नाही हे पाहून पवारांनी ‘रोहित फॉर्म्युला” पुढे केला. लोकसभेला पवारांनी सुजय विखे (Sujay Vikhe Rohit Pawar) यांच्यासाठी नगर मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. ‘दुसऱ्यांच्या नातवांचे लाड का पुरवू…..’ ही टीका पवार यांनी केली होती. मात्र आता कर्जत-जामखेडच्या विकासासाठी स्थानिक लोक सक्षम आहेत. बाहेरच्यांची गरज काय? अशी टीका विखे यांनी पवारांवर केली आहे.

राम शिंदे यांची या मतदारसंघावर स्वत:ची पकड आहेच. त्यांना आता विखेंचीही ताकद मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत शिंदे हे पुढील मंत्रिमंडळातही मंत्री राहतील असं जाहीर केलं. त्यामुळे एकीकडे विखे आणि शिंदेंच्या पुढे पवारांना ही निवणूक सोपी नाही असंच चित्र सध्या दिसतंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *