AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन टायगर फेल होणार? ओमराजेंच्या भेटीनंतर वरुण देसाईंनी दिली प्रतिक्रिया, ज्या विषयावर…

Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, ओमराजे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई हे ओमराजेंच्या भेटीला गेले होते. नेमकं काय घडलं वाचा...

ऑपरेशन टायगर फेल होणार? ओमराजेंच्या भेटीनंतर वरुण देसाईंनी दिली प्रतिक्रिया, ज्या विषयावर...
Varun sardesaiImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 21, 2026 | 9:00 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात आहे.दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची तयारी ओमराजे निंबाळकर करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच दरम्यान पुण्यात मध्यरात्री अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या.

पुण्यातील मध्यरात्रीची हायव्होल्टेज भेट

ठाकरे गटाने ओमराजे निंबाळकर यांना मनधरणीसाठी मोठा प्रयत्न केला. पक्ष सचिव वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे दोघे मध्यरात्री १ वाजता अचानक ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचले. उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाचा निरोप घेऊन दोन्ही नेते त्यांच्या घरी गेल्याने राजकीय वर्तुळात सस्पेन्स वाढला आहे.

वरुण देसाईंनी मांडली स्पष्ट भूमिका

वरुण सरदेसाई यांनी थेट भूमिका स्पष्ट करण्यास टाळाटाळ केली. ते म्हणाले, “ओम दादांबाबत जो निर्णय झाला, तो अनपेक्षित होता. त्यांच्या संपूर्ण परिवाराला मोठा धक्का बसला आहे. यावर आम्ही चर्चा केली. ते आजही शिवसेना (ठाकरे गट) च्या चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. त्यांनी पहिल्यांदा आमदारकी जिंकली आणि नंतर तीनवेळा खासदारकी मिळवली. आम्ही पक्ष सचिव म्हणून त्यांची भेट घेतली आणि काही अंतर्गत मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र, सर्व गोष्टी माध्यमांसमोर सांगणे योग्य नाही. जर सर्व उघड करायचे असते, तर आम्ही मध्यरात्री भेटलो नसतो.”

कैलास पाटील काय म्हणाले?

आमदार कैलास पाटील यांनी मात्र मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “गेल्या २० वर्षांपासून ओमराजे ज्या गोष्टींसाठी संघर्ष करत आहेत, त्यांना न्याय मिळाला नाही, अशी त्यांची भावना आहे. तरीही आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचा निरोप घेऊन त्यांच्याकडे आलो होतो. उद्धव साहेबांबद्दल ओमराजे यांच्या मनात आजही आदरभावना कायम आहे. त्यामुळे ते पक्षातच राहतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. साहेबांचा निरोप ऐकल्यानंतर ओम दादांनी ‘मला उद्याचा एक दिवस द्या, त्यानंतर मी माझा निर्णय सांगतो’ असे सांगितले आहे. त्यामुळे पुढचे २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.”

Follow Us
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा