जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 29, 2020 | 4:34 PM

धार्मिक स्थळ उघडली आणि कोरोना वाढला असं कोठेही घडलेलं नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis on Ghantanad Andolan and Covid Pandemic) 

जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस
Follow us on

कोल्हापूर- सांगली : “कोरोनाबाबत आम्ही सहकार्याची भूमिका घेतली आहे. सरकारकडूनही प्रो अॅक्टिव्ह रोल असला पाहिजे. धार्मिक स्थळं उघडली आणि कोरोना वाढला असे आतापर्यंत कुठेही घडलेलं नाही,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याबाबत कोल्हापूर आणि सांगलीत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Devendra Fadnavis on Ghantanad Andolan and Covid Pandemic)

“दारुची दुकाने उघडण्याने काय होते आणि मंदिरं खुली केल्याने काय होतं, हे सर्वांना कळते. जो उत्साह दारुची दुकाने उघताना दाखविला. त्यातील अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडण्यासाठी सरकारने दाखवायला हवा,” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

“प्रशासनापेक्षा शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शासन ज्या पद्धतीने चालते, त्याच पद्धतीने साधारणत: प्रशासन पुढे जात असते. सरकार आणि मंत्री लक्ष घालतील, तेव्हाच निर्णय प्रक्रियेला वेग येईल. आपली कार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवलं जातं आहे. त्यामुळे निर्णय मातोश्रीवरुन घ्या किंवा वर्षावरुन घ्या. धार्मिक स्थळं उघडली आणि कोरोना वाढला असं कोठेही घडलेलं नाही, असे फडणवीस म्हणाले. सुशांत सिंह प्रकरणात आम्हाला विनाकारण ओढण्याचा प्रयत्न होतो आहे,” असेही त्यांनी सांगितले.

सांगलीचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक – देवेंद्र फडणवीस

दरम्यान आज देवेंद्र फडणवीसांनी सांगलीतील मिरजजवळील शासकीय कोव्हिड रुग्णालयाला भेट दिली. त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कोरोना परिस्थितीबाबत राज्य सरकारवर खाफर फोडलं.

“कोरोनाच्या आपत्तीबाबत सरकार आणि मंत्री गंभीर नाहीत. कोरोनाबाबतची जबाबदारी फक्त प्रशासनाची नव्हे तर शासनाची असते. राज्यसरकार म्हणावं तितकं प्रशासनाला सहकार्य करत नाहीत,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“सांगली जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर 4.1 इतका आहे. हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक आहे. याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. महात्मा जन आरोग्य योजनेत रुग्णांना लाभ मिळत नाहीत. खासगी रुग्णालयात ही योजना बंद केल्याची माहिती येत आहे. रुग्णांना इंजेक्शनचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे याबाबत आरोग्यमंत्र्यांना भेटणार आहे,” असंही फडणवीसांनी यावेळी सांगितले. (Devendra Fadnavis on Ghantanad Andolan and Covid Pandemic)

संबंधित बातम्या : 

परभणीत राष्ट्रवादीला ‘दे धक्का’, संजय जाधव यांच्या राजीनामा नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

राज्यभरात भाजपचं मंदिरं सुरु करण्यासाठी घंटानाद आंदोलन, ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची घोषणाबाजी