पंकजा मुंडे भर सभेत स्टेजवर कोसळल्या, डॉक्टर काय म्हणाले?

| Updated on: Oct 19, 2019 | 7:10 PM

पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून भर उन्हात सभा घेत (Pankaja Munde faints) आहेत. त्यामुळे त्यांना हायपरथर्मिया (Hyperthermia) किंवा हिट एक्सझोर्शनचा (Heat exhaustion) त्रास झाला असण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे भर सभेत स्टेजवर कोसळल्या, डॉक्टर काय म्हणाले?
Follow us on

बीड :  भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde faints) या भाषणादरम्यान स्टेजवर कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे घटनास्थळी एकच धावाधाव झाली.

परळीत आज आयोजित केलेल्या एका सभेदरम्यान पंकजा मुंडेंनी केवळ नाश्ता केला होता. त्यांनी दिवसभर जेवण केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना भोवळ आल्याचं सांगण्यात येत आहे.

पंकजा मुंडे यांना अचानक चक्कर का आली, याबाबत टीव्ही 9 मराठीने वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे. पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून भर उन्हात सभा घेत (Pankaja Munde faints) आहेत. त्यामुळे त्यांना हायपरथर्मिया (Hyperthermia) किंवा हिट एक्सझोर्शनचा (Heat exhaustion) त्रास झाला असण्याची शक्यता आहे. हायपरथर्मिया किंवा हिट एक्सझोर्शन हा उष्माघाताचा एक प्रकार आहे.

शरीराने मर्यादेपेक्षा जास्त उष्णात शोषून घेतल्यावर हायपरथर्मिया (Hyperthermia) किंवा हिट एक्सझोर्शनचा (Heat exhaustion) त्रास होतो. हा उष्माघाताचा एक प्रकार आहे. बाहेरील तापमान प्रमाणाबाहेर वाढलं की, शरीरातील तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा कोलमडते. कडक उन्हाळा असला, तरी घाम बाहेर पडत नाही. त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. यालाच उष्माघाताचे लक्षण होते, असेही डॉक्टरांना सांगितले.

यामुळे सुरुवातीला रक्तदाब वाढतो आणि नंतर तो कमी होतो. त्यानंतर संबंधित माणसाला चक्कर येते. तसेच त्याचे मानसिक संतुलन बिघडते.

प्राथमिक लक्षण

  • चक्कर येणे
  • थकवा जाणवणे
  • छातीत धडधडणे
  • प्रचंड घाम येणे
  • मळमळणे किंवा उलट्या होणे
  • डोकेदुखी
  • स्नायू किंवा ओटीपोटात दुखणे

प्रथमोपचार

  • जर कोणाला उष्माघाताचा त्रास झाला, तर त्वरित विश्रांती घेणे गरजेचे आहे.
  • उष्माघाताचा त्रास झाल्यास एखाद्या व्यक्तीला द्रव पदार्थ प्यायला द्या
  • एखादं एनर्जी ड्रिंक किंवा ग्लुकॉन्डी देणे यावेळी योग्य ठरते
  • त्यानंतर त्या व्यक्तीने घट्ट कपडे घातले असतील, तर ते तात्काळ काढा
  • त्या व्यक्तीला कोमट पाण्याने अंघोळ करायला सांगा
  • त्या व्यक्तीला खोलीतील पंखा किंवा एसी ताबडतोब चालू करुन हवा द्याृ
  • जर हे उपाय केल्यानंतर संबंधित व्यक्तीला शुद्ध आली नाही, तर त्याला ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.

उष्माघातापासून बचावाचे काही उपाय

  • जर तुम्हाला उष्माघातापासून बचाव करायचा असेल, तर भरपूर प्रमाणात पाणी प्या.
  • पाण्याचे प्रमाण असलेल्या फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
  • व्यायामावेळीही एनर्जी ड्रिंक प्या
  • तरुण किंवा वृद्धांना उष्माघाताचा त्रास जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे त्यांनी आपल्यासोबत कायम एक पाण्याची बाटली ठेवावी.