AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“गुन्हे नोंदवण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर…” दसरा मेळाव्यातील गर्दी प्रकरणी गुन्ह्यानंतर पंकजांची प्रतिक्रिया

मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा ऑनलाईन घेण्याचं ठरलं असताना पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी गर्दी केली होती

गुन्हे नोंदवण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर... दसरा मेळाव्यातील गर्दी प्रकरणी गुन्ह्यानंतर पंकजांची प्रतिक्रिया
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 27, 2020 | 10:29 AM
Share

मुंबई : “दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी परवानगी घेऊन गेले असता गुन्हा दाखल झाले. कार्यकर्त्यांनंतर गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. दसरा मेळाव्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पंकजा यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pankaja Munde first reaction after FIR for Online Dassera Melawa at Bhagwan Garh)

“अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

विजयादशमीच्या मुहुर्तावर काल (रविवार 25 ऑक्टोबर) सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक समर्थकांनी यावेळी गर्दी केली. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. त्यानंतर भगवान गडावर पूजा-अर्चना केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

ऑनलाईन दसरा मेळावा घेतल्याने पंकजा मुंडेंसह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या 25 फुटी मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली होती. भगवानबाबांच्या स्मृतिस्थळ परिसरात पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (Pankaja Munde first reaction after FIR for Online Dassera Melawa at Bhagwan Garh)

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“दसऱ्या मेळाव्याला कोणीही येऊ नये, असं मी सांगितलं आहे. परंतु ऑनलाइन मेळावा असतानाही बरेच लोक आले आहेत. हेलिकॉप्टरनं येण्याची परंपरा होती, पण कोरोनामुळे ही हेलिकॉप्टरऐवजी गाडीनं आले. अतिवृष्टीनं शेतकरी बेजार झाला आहे. भगवान बाबांची मूर्ती माझ्या पाठीशी आहे. भगवान बाबा आशीर्वाद पाठीशी आहे हे इथे येताना जाणवत होतं. माझे बंधू महादेव जानकर यांच्याशिवाय माझा कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

दसरा मेळाव्यातील गर्दी महागात, पंकजा मुंडेंसह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी; पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला

(Pankaja Munde first reaction after FIR for Online Dassera Melawa at Bhagwan Garh)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...