पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यावं ही माझी सुद्धा इच्छा; बहिणीसाठी बहीण धावली

| Updated on: Sep 25, 2022 | 4:06 PM

पंकजाताई यांनी आव्हान करायचं आणि लोकांनी भरभरून साद द्यायचं हे समीकरण नाही. लोक उत्स्फूर्तपणे दसरा मेळाव्याला येतात. यावर्षी नव्याने गर्दीचा विक्रम होईल ही अपेक्षा आहे.

पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यावं ही माझी सुद्धा इच्छा; बहिणीसाठी बहीण धावली
पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यावं ही माझी सुद्धा इच्छा; बहिणीसाठी बहीण धावली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महेंद्र मुधोळकर, टीव्ही9 प्रतिनिधी, बीड: राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचं सरकार जाऊन एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचं सरकार आलं. या सरकारच्या पहिल्या विस्तारात मोजक्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. दुसरा विस्तार अजून व्हायचा बाकी आहे. कालच राज्य सरकारने पालकमंत्रीही जाहीर केले. राज्यात नवं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे यांचा या सरकारमध्ये समावेश होईल, अशी अटकळ होती. पण पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यावरून पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले आहेत. पंकजा मुंडे यांना विधान परिषद, राज्यसभाही देण्यात आली नाही. त्यात आता मंत्रीपदही देण्यात न आल्याने पंकजा समर्थक नाराज असतानाच त्यांची बहीण आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे मंत्री व्हाव्यात असं त्या म्हणाल्या आहेत.

खासदार प्रीतम मुंडे या मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळावे जशी जनतेची इछा आहे. हीच इच्छा माझी देखील आहे, असं प्रीतम मुंडे यांनी सांगितलं. प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदाच ही जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पंकजाताई यांनी आव्हान करायचं आणि लोकांनी भरभरून साद द्यायचं हे समीकरण नाही. लोक उत्स्फूर्तपणे दसरा मेळाव्याला येतात. यावर्षी नव्याने गर्दीचा विक्रम होईल ही अपेक्षा आहे. दसरा मेळावा हा भगवान भक्ती गडावर होणार आहे. पंकजा मुंडे ह्या दरवर्षीप्रमाणे सावरगाव येथे समाजाला संबोधित करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

यंदा मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या दिवशी भगवान बाबांचे आशीर्वाद घेण्याची ही परंपरा आहे, असं सांगतानाच मेळाव्याचं ठिकाण बदलणारी ती माणसे कोण आहेत?, असा सवाल करत प्रीतम यांनी भगवान गडावर मेळावा घ्या म्हणणाऱ्यांना फटकारलं.

दरम्यान, दरवर्षी पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दसरा मेळावा होत असतो. राज्यात भाजपचं सरकार आहे. त्यात पंकजा मुंडे यांना कोणतंही स्थान देण्यात आलं नाही. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.