AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात 90% महिलांच्या कारकिर्दीची सुरुवात नेत्यांच्या शय्येवरून…, खासदाराची जीभ घसरली, भडकल्या मैथिली ठाकूर

अपक्ष खासदार पप्पू यादव उर्फ ​​राजेश रंजन यांनी महिलांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वत्र संतापाती लाट उसळली आहे... यावर भाजप खासदार मैथिली ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे... नक्की काय आहे प्रकरण घ्या जाणून...

राजकारणात 90% महिलांच्या कारकिर्दीची सुरुवात नेत्यांच्या शय्येवरून..., खासदाराची जीभ घसरली, भडकल्या मैथिली ठाकूर
MP Maithili Thakur
| Updated on: Apr 27, 2026 | 11:52 AM
Share

राजकीय नेत्यांनी अनेकदा वक्तव्य करत असताना जीभ घसरते. आता देखील असंच काही झालं आहे. बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव उर्फ ​​राजेश रंजन यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू असलेला वाद दिवसागणिक अधिक पेटत आहे… पप्पू यादव यांच्या वक्तव्यानंतर इतर पक्षातील नेते देखील निशाण्यावर आले असताना, भाजप खासदार मैथिली ठाकूर यांनी संताप व्यक्त करत तिव्र प्रतिक्रिया दिली आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी भारतीय राजकारणात महिलांच्या भूमिकेबद्दल मोठं विधान केलेलं. पप्पू यादव म्हणालेले, ‘राजकारणात 90% महिलांच्या कारकिर्दीची सुरुवात नेत्यांच्या शय्येवरून सुरु होतो…. आता राजकारणात महिलांना बळीचा बकरा बनवण्याची संस्कृती रुजली आहे…’, असं वादग्रस्त विधान पप्पू यादव यांनी केलं.

अत्यंत असभ्य टिप्पणी – मैथिली ठाकूर

पप्पू यादव यांच्या विधानावर मैथिली ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे… ‘मला नाही वाटत की, अशा लोकांना माफ केलं पाहिजे… त्यांनी माफी मागितली तरी त्यांनी मी माफ करु शकणार नाही. कारण त्यांनी फार मोठा आघात केला आहे. पप्पू यादव यांनी केलेलं विधान अत्यंत असभ्य आहे.’

‘मी स्वतः अशा कुटुंबातून येते, जेथे कुठेही जाण्यापूर्वी आम्ही त्या जागेबद्दल सर्व माहिती मिळवतो… तिथलं वातावरण कसं आहे ते पाहतो… माझ्या वडिलांचा विश्वास आहे, म्हणून त्यांनी मला राजकारणात येण्यासाठी प्रेरित केलं… त्यांनी महिला नेत्यांवर खूप मोठा कलंक लावला आहे.’, असं मैथिली ठाकूर म्हणाल्या.

पप्पू यादव यांनी मागितली माफी पण ठेवली अट

पप्पू यादन यांनी महिला नेत्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. तेव्हा त्यांनी माफी मागितली. पण माफी मागताना त्यांनी एक अट देखील ठेवली. पप्पू यादव म्हणाले, ‘जर माझ्या शब्दांमुळे महिलांना ठोस पोहचली असेल तर, मी माफी मागतो. पण ही माफी फक्त माझ्या बहिणी आणि माझ्या मुलींसाठी आहेत. नेत्यासाठी नाही…’ पुढे पप्पू यादव म्हणाले, त्यांचा विरोध घाणेरड्या राजकारण्यांना आहे. ज्यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. राजकारणात सक्रिय असलेल्या महिलांवर मी गिधाडांना नजर टाकू देणार नाही… असं देखील पप्पू यादव म्हणाले.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत