Parambir Singh Letter : ‘आयपीएस सेवेतील सिंह, कोल्हे बनतात तेंव्हा!’ माजी पोलीस महासंचालकांची परमबीर सिंगांवर टीका

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी परमबीर सिंग यांच्यावर पलटवार करत आहेत. अशा स्थितीत निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे यांनी काही आक्षेप नोंदवणारे मुद्दे उपस्थित केले आहेत.

Parambir Singh Letter : 'आयपीएस सेवेतील सिंह, कोल्हे बनतात तेंव्हा!' माजी पोलीस महासंचालकांची परमबीर सिंगांवर टीका
परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावर निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे यांचा आक्षेप
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 11:45 PM

मु्ंबई : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करत त्यांची रवानगी गृहरक्षक दलात करण्यात आली. त्यावर परमबीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप आहे. त्यावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी परमबीर सिंग यांच्यावर पलटवार करत आहेत. अशा स्थितीत निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे यांनी काही आक्षेप नोंदवणारे मुद्दे उपस्थित केले आहेत.(Retired Director General of Police Suresh Khopde criticizes Parambir Singh’s letter)

सुरेश खोपडे यांनी काय म्हणतात?

बदली झाल्यावर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याची प्रत माध्यमामध्ये जाईल याची सोय केली आणि देशभर एक हवा निर्माण केली. त्यात त्यांनी केलेले महत्वाचे आरोप पुढील प्रमाणे –

*गृह मंत्र्यांनी वाझे यांना अनेकवेळा सरकारी बंगल्यावर बोलावून दरमहा शंभर कोटी रुपये फंड गोळा करण्याबद्दल सूचना दिल्या होत्या. *मला डावलून गृहमंत्री खालच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत असत.तपासात हस्तक्षेप करत. * ज्यांनी(वाजे )चूक केली त्यांना जबाबदार धरावे. मी कसा दोषी ठरतो? वगैरे

तपासाअंती सर्व समजेल- खोपडे

परमबीर सिंग हे या प्रकरणातील नाहक बळी आहेत, की निर्दोष,की अपयशी, की मुक संमती असलेले होते, की लाभार्थी, की गुन्हेगार? की कळसूत्री बाहुली, की,…? हे पूर्ण तपासांती समजेल.

>> आपल्या एका ज्युनिअर अधिकाऱ्याला आपल्या हद्दीतून पैसे गोळा कराय ला सांगितले हे समजल्यावर कमिशनर काय करू शकतो? >> स्पष्ट तोंडी नकार देवू शकतो >> लेखी पत्र देवून नकार कळवू शकतो.मंत्री व अधिकाऱ्यांना >> दिलेल्या सूचनांची लेखी नोंद कोणत्याही एका अगर सर्वच पोलिस स्टेशनमधील डायरी मध्ये करू शकतो. कारण पोलीस स्टेशन मधील स्टेशन डायरी नोंद हा एकमेव पुरावा अगदी सुप्रीम कोर्ट पर्यंत ग्राह्य धरला जातो.

पोलीस डायरीत नोंद का नाही?

ताब्यातील अधिकाऱ्यांना परस्पर बोलविण्याचा आणि तपासाबाबत वाजवी कायदेशीर सूचना देण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना आहे, असतो. शेवटी सरकार म्हणजे कॅबिनेट मंत्री. म्हणूनच कोणत्याही अपयशाबद्दल विरोधी पक्ष मंत्र्यांचा राजीनामा मागते. मंत्र्यांनी दिलेल्या सूचना तपासी अंमलदार यांच्यावर बंधनकारक नसल्या तरी तपासी अंमलदार त्या सूचनांची नोंद तपासाच्या केस डायरी मध्ये करतात. ती करणे बंधन कारक असते. केस डायरीतील नोंद याला पुराव्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. ग्रहमंत्र्यानी केलेल्या हस्तक्षेपाच्या नोंदी परमबीर सिंग यांनी केलेल्या आहेत का?

‘परमबीर सिंगांचा युक्तीवाद पोरकट’

*मोहन डेलकरांचा गुन्हा मुंबईत दाखल न करण्याचा परमबीर यांचा युक्तिवाद हा घटनाबाह्य आणि पोरकट वाटतो. आत्महत्येचा गुन्हा मुंबईत घडला म्हणजे गुन्हा मुंबईतच दाखल झाला पाहिजे हे गृह मंत्र्याचे म्हणणे योग्य आहे. *एसीपी पाटील यांचे व्हॉट्स अॅप वरील संभाषण नंतर तयार केलेले दिसते.अशा गोष्टींबद्दल असा संवाद संशया स्पद वाटतो. *पत्राबद्दल मत मांडा अस मला काल अनेक वाहिन्या आग्रह करीत होत्या. मी नकार दिला होता कारण ते पत्र मी अभ्यासले नव्हते. आज अभ्यासले. या पत्राला पुरावा मूल्य (evidential value) अजिबात नाही. *पत्र नैसर्गिक प्रतिक्रिया नसून कारवाई नंतर आलेल्या विचारातून लिहिल्या सारखे (after thought) जाणवते. *पत्रात नमूद केलेल्या घटना घडत असताना अर्जदाराची अगोदरची वर्तणूक (previous conduct) आणि दोषी ठरवून बदली केल्यानंतरच्या काळातील वर्तणूक (subsiquent conduct) यात फार मोठी तफावत जाणवते. यात कुठलाही कायदेशीर पुरावा नसून सामान्य माणसासाठी सनसनाटी आणि विरोधीपक्षासाठी चारा दिसतो.

वर्तणूक लबाड कोल्ह्याची- खोपडे

अर्जदार इंडियन पोलिस सर्व्हिस मधील सिंग आडनावाचे अधिकारी असले तरी पिंजऱ्यात अडकलेल्या धूर्त कोल्हयासारखी त्यांची धडपड दिसते. या प्रकरणाची सर्वांग चौकशी झाली पाहिजे. आजचे आयपीएस अधिकारी यांचे मूळ एकेकाळी आयपी या ब्रिटिश सेवेत आहे. मुठभर आयपी अधिकारी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कायदा सुव्यवस्था राखायाचे काम करतात. आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात आणि वर्तणूक लबाड कोल्ह्याची करतात. पोलीस दलाची दुर्दशा व्हायला हेच आयएएस आणि आयपीएस नेतृत्व जबाबदार आहे हे मी अनेक वर्ष मांडत आलोय! अशा शब्दात सुरेश खोपडे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

संबंधित बातम्या :

Parambir Singh Letter : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील

Mansukh Hiren Murder : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, ATS चे DIG शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट

Retired Director General of Police Suresh Khopde criticizes Parambir Singh’s letter

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.