Parambir Singh Letter : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील

भाजपनं गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी केलीय. पण गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.

Parambir Singh Letter : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही - जयंत पाटील
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, जंयत पाटील यांच्याकडून स्पष्ट
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 9:37 PM

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर भाजपनं गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी केलीय. पण गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.(Jayant Patil makes it clear that there is no need for Anil Deshmukh to resign over allegations made by Parambir Singh)

‘गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही’

राजनाधी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यावेळी पत्रकारांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘ATS, NIA च्या चौकशीतून ठोस समोर येईल’

सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तो तपास लवकरच पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्याची गरज नाही. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरच फोकस राहील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांवर आरोप झाले. त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. पण मी त्या खोलात जात नाही. सध्या जे प्रमुख विषय आहेत त्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते आम्ही होऊ देणार नाही, असंही पाटील म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर याबाबत आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याबाबत मी अधिक काही बोलणार नाही, असं अजितदादा म्हणाले. त्यामुळे सध्यातरी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिल्याचं दिसून येत आहे.

संबंधित बातम्या :

Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांचा भाजपशी थेट संबंध! सिंग भाजपच्या कोणत्या नेत्याचे व्याही?

गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का?; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल

Jayant Patil makes it clear that there is no need for Anil Deshmukh to resign over allegations made by Parambir Singh

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.