Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांचा भाजपशी थेट संबंध! सिंग भाजपच्या कोणत्या नेत्याचे व्याही?

गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा आरोप सिंग यांनी आपल्या पत्रात केलाय. अशावेळी आता परमबीर सिंग यांचा भाजपसोबत थेट संबंध असल्याचं आता सांगण्यात येत आहे. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांचा भाजपशी थेट संबंध! सिंग भाजपच्या कोणत्या नेत्याचे व्याही?
परमबीर सिंग आणि भाजप नेते सागर मेघे हे व्याही आहेत.
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 8:17 PM

मुंबई : पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा आरोप सिंग यांनी आपल्या पत्रात केलाय. अशावेळी आता परमबीर सिंग यांचा भाजपसोबत थेट संबंध असल्याचं आता सांगण्यात येत आहे. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.(Parambir Singh is said to be a relative of BJP leader Sagar Meghe)

परमबीर सिंग हे भाजप नेते सागर मेघे यांचे व्याही

परमबीर सिंग आणि भाजप नेते सागर मेघे हे व्याही आहेत. सिंग यांचा मुलगा रोहनचं लग्न भाजप नेते सागर मेघे यांची कन्या राधिकाशी झालं आहे. सागर मेघे हे दत्ता मेघे यांचे पुत्र आहेत. काँग्रेसवासी असलेल्या दत्ता मेघे यांच्या कुटुंबानं 2014 मध्ये भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सागर मेघे यांनी वर्धा जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

बंगळुरुमध्ये शाही विवाह सोहळा

परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन आणि सागर मेघे यांची कन्या राधिका यांचा विवाह 2017 मध्ये बंगळुरु इथं पार पडला होता. तेव्हा परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्तपदावर कार्यरत होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

दत्ता मेघे हे पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात

दत्ता मेघे हे 2014 पूर्वी काँग्रेसचे नेते होते. ते काँग्रेसमधून तब्बल 4 वेळा खासदार राहिले आहेत. 10 व्या लोकसभेत त्यांनी नागपूरमधून विजय मिळवला होता. त्यानंतर ते रामटेक आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातूनही खासदार राहिले आहेत. दत्ता मेघे हे काँग्रेसचे नेते जरी राहिलेले असले तरी त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे चांगले संबंध राहिले आहेत. ते पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. मात्र 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब

मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिलं आहे. हे एकूण 8 पानी पत्र आहे. त्यात 23 मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. त्याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सांगितलं होतं, असं सिंग यांनी म्हटलंय. तसंच अन्य अनेक गंभीर आरोप सिंग यांनी या पत्रात केले आहेत.

संबंधित बातम्या :

गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का?; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल

Parambir Singh letter: भाजपची कोंडी करण्यासाठी डेलकर आत्महत्येचा वापर? परमबीर सिंगांचा पत्रात गंभीर आरोप

Parambir Singh letter : परमबीर सिंगांच्या पत्रात थेट पुरावा, मुख्यमंत्र्यांना कारवाईसाठी अजून काय हवं?, फडणवीसांचा सवाल

Parambir Singh is said to be a relative of BJP leader Sagar Meghe

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.