पवारांचा सल्ला म्हणजे सूचना, मुख्यमंत्र्यांकडून आदर होईल, शिवसेना स्टाईलवर नितीन राऊतांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 13, 2020 | 12:46 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सल्ला देतात ती एक सूचना असते, त्या सूचनेचा आदर राज्यात होईल, याची मला खात्री आहे, असं काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं.

पवारांचा सल्ला म्हणजे सूचना, मुख्यमंत्र्यांकडून आदर होईल, शिवसेना स्टाईलवर नितीन राऊतांची प्रतिक्रिया
Follow us on

नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सल्ला देतात ती एक सूचना असते, त्या सूचनेचा आदर राज्यात होईल, याची मला खात्री आहे, असं काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं. शरद पवार यांनी सामनाच्या मुलाखतीत “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते शिवसेना शैलीत काम करतात, त्यांनी मित्रपक्षांशीही संवाद ठेवायला हवा”, असं नमूद केलं होतं. त्यावर नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. (Nitin Raut comment on Sharad Pawar interview)

महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

टीव्ही 9 मराठीशी बोलाताना नितीन राऊत म्हणाले, “महाराष्ट्र सरकारला कुठलाही धोका नाही. आमचं सरकारही मजबूत स्थितीत आहे. शरद पवार हे सल्ला देतात ती एक सूचना असते, त्या सूचनेचा आदर राज्यात होईल, याची मला खात्री आहे”. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता, उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षांशी संवाद ठेवावा असंच नमूद केलं. (Nitin Raut comment on Sharad Pawar interview)

राजस्थानच्या राजकारणावर भाष्य
“कोरोनाच्या संकटाच्या काळात सरकार अस्थिर करणं योग्य नाही, राजस्थानमध्ये भाजपकडून धोकेबाजार सुरु आहे, राजस्थान सरकार अनुभवी नेत्याच्या हातात, आम्ही सरकार वाचवू”, असं नितीन राऊत म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते?

“आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो, की आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर मतभेदाची  चर्चा सुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही, फक्त डायलॉग दिसत नाही” असं म्हणत पवारांनी ठाकरेंकडून संवादाची अपेक्षा व्यक्त केली.

“आम्हाला अजिबात कोणतीही अडचण नाही. मात्र सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची ही पद्धत नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकट्याचं नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांमध्ये दोघांची काही मतं असतील, तर ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे” असं पवार म्हणाले.

(Nitin Raut comment on Sharad Pawar interview)

संबंधित बातम्या 

शिवसेनेसोबत आम्ही दोघेही, ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त… : शरद पवार  

शिवसेना भाजपपासून दूर व्हावी, या हेतूने ‘ते’ वक्तव्य केले : शरद पवार