शिवसेनेसोबत आम्ही दोघेही, ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त… : शरद पवार

"शिवसेनेमध्ये नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची ही पद्धत आहे." असं शरद पवार 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले

शिवसेनेसोबत आम्ही दोघेही, ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त... : शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 10:10 AM

मुंबई : सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीत उणे काहीच नाही, फक्त त्यांनी संवाद ठेवावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रदर्शित झाला. (Sharad Pawar in Saamana Interview express his expectations from CM Uddhav Thackeray)

“उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा वेगळी आहे. त्याचं कारण उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत शिवसेनेची आहे. शिवसेनेत आदेशाने काम करण्याची पद्धत आहे, हे मी सेनेच्या स्थापनेपासून पाहतोय.” असं पवार म्हणाले.

“काँग्रेस-राष्ट्रवादी आम्ही ज्या विचाराने वाढलोय, आम्ही वरिष्ठांच्या मतांचा आदर करतो, पण वरिष्ठांकडून आदेश येतोच असं नाही आणि समजा एखादे मत मांडले, तर त्यावर आम्ही चर्चा करु शकतो, ही आमच्या कार्यकारिणीची पद्धत आहे.” असे शरद पवार यांनी सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“शिवसेनेमध्ये नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची ही पद्धत आहे. या विचाराने तो पक्ष चालला आणि यशस्वीसुद्धा झाला. सध्याचे मुख्यमंत्री त्याच पठडीतले आहेत आणि माझी काहीच तक्रार नाही” असं पवारांनी सांगितलं.

“आम्हाला अजिबात कोणतीही अडचण नाही. मात्र सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची ही पद्धत नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकट्याचं नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांमध्ये दोघांची काही मतं असतील, तर ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे” असं पवार म्हणाले.

“आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो, की आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चा सुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही, फक्त डायलॉग दिसत नाही” असं म्हणत पवारांनी ठाकरेंकडून संवादाची अपेक्षा व्यक्त केली.

संबंधित बातम्या

शिवसेना भाजपपासून दूर व्हावी, या हेतूने ‘ते’ वक्तव्य केले : शरद पवार

फडणवीसांच्या गौप्यस्फोटात काही तथ्य नाही : शरद पवार

जेव्हा चिनी संरक्षण मंत्र्यांनी शरद पवारांना अज्ञातस्थळी नेले होते…

तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

(Sharad Pawar in Saamana Interview express his expectations from CM Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.