अमजद खान, निजामुद्दीन शेख, हिना साळुंखे कोण आहेत माहितीय का? राज्यातल्या नेत्यांच्या फोन टॅपिंगची मोडस ऑपरेंडी सभागृहानं ऐकली

| Updated on: Mar 14, 2022 | 8:23 PM

फडणवीसांनी आज वक्फ बोर्डावर दाऊदशी संबंधित लोकांची नियुक्ती केल्याचा आरोप करत अजून एक पेनड्राईव्ह दिलाय. फडणवीसांच्या या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा उल्लेख केला आणि त्यात ज्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले त्यांची नावं काय ठेवण्यात आली होती त्याची यादीच वाचून दाखवली.

अमजद खान, निजामुद्दीन शेख, हिना साळुंखे कोण आहेत माहितीय का? राज्यातल्या नेत्यांच्या फोन टॅपिंगची मोडस ऑपरेंडी सभागृहानं ऐकली
नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकार विशेष सरकारी वकिलांसोबत (Special Public Prosecutor) मिळून विरोधकांविरोधात षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप केला. फक्त आरोप करुनच फडणवीस थांबले नाहीत तर त्यांनी प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन असलेला एक पेन ड्राईव्हच विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी ही त्यांनी केलीय. त्यानंतर फडणवीसांनी आज वक्फ बोर्डावर दाऊदशी संबंधित लोकांची नियुक्ती केल्याचा आरोप करत अजून एक पेनड्राईव्ह दिलाय. फडणवीसांच्या या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी भाजपच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा उल्लेख केला आणि त्यात ज्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले त्यांची नावं काय ठेवण्यात आली होती त्याची यादीच वाचून दाखवली.

वळसे-पाटलांचा फडणवीसांवर पलटवार

दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, रश्मी शुक्लांची जी केस आहे. त्याची वस्तुस्थिती फक्त समोर आणतो. महाराष्ट्र विधानमंडळाच्या 2011 च्या द्वितीय अधिवेशनात नाना पटोले यांनी लोकप्रतिनिधींचे मोबाईल टॅपिंग झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अन्य काही आमदारांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. या आरोपाच्या अनुषंगानं याच सभागृहात उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असं आश्वासन मी दिलं होतं. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही त्यात सांगितलं होतं.

नाना पटोलेंचं नाव ‘अमजद खान’ तर बच्चू कडूंचं ‘निजामुद्दीन शेख’!

2015 ते 2019 या काळातील फोन टॅपिंगच्या संदर्भात पडताळणी करण्यासाठी शासनानं 9 सप्टेंबर 2019 ला आदेश काढला. पोलीस संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली. सदर उच्चस्तरिय समितीला 15 ते 19 या काळातील फोन टॅपिंगचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. तो अहवाल त्यांनी दिला आणि तो राज्य सरकारनं स्वीकारला. त्या अहवालातून पुढे काय आलं तर 2017 ते 2018 या काळात पुणे शहरात आयुक्त असलेल्या रश्मी शुक्ला यांनी 4 लोकप्रतिनिधींचे 6 भ्रमणध्वनी टॅप केल्याच समोर आलं. त्यात नाना पटोले यांचं नाव काय ठेवलं होतं तर अमजद खान. बच्चू कडू यांचं नाव ठेवलं होतं निजामुद्दीन बाबू शेख. संजय काकडे हे तर त्यावेळी भाजपचे खासदार होते. त्यांचं नाव ठेवलं होतं तरबेज सुतार. आशिष देशमुख त्यावेळी भाजपचेच आमदार होते, त्यांच नाव ठेवलं होतं रघू चोरगे. आशिष देशमुखांचा दुसरा फोन, त्यांचं नाव ठेवलं हिना महेश साळुंके!… या अहवालात रश्मी शुक्ला यांच्याबद्दल गंभीर बाबी नमूद करण्यात आल्याचंही यावेळी वळसे-पाटील यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

प्रवीण चव्हाण यांनी वकीलपत्राचा राजीनामा दिला, पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीला सोपवणार; दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा

गृहमंत्र्यांना सांगा मी FBI म्हणजे ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ काढलाय; फडणवीसांचा वळसे-पाटलांना टोला