बिहारमध्ये अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित ‘एनडीए’चा विजय; पंतप्रधान मोदींचे सलग सहा ट्वीट

| Updated on: Nov 11, 2020 | 8:17 AM

बिहार निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत जनेतेचे आभार मानले. (PM Narendra Modi Tweet After NDA Win Bihar Election 2020)

बिहारमध्ये अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित एनडीएचा विजय; पंतप्रधान मोदींचे सलग सहा ट्वीट
Follow us on

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल तब्बल 18 तासांनी जाहीर झाला. या चुरशीच्या लढाईत अखेर भाजप-जेडीयूच्या एनडीएने बहुमताचा जादुई 122 हा आकडा गाठला. विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी एनडीएला 122 जागा मिळाल्या. त्यामुळे बिहारमध्ये भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालं आहे. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत जनेतेचे आभार मानले. (PM Narendra Modi Tweet After NDA Win Bihar Election 2020)

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

“बिहारने जगाला लोकशाहीचा धडा शिकवला आहे. बिहारने लोकशाही मजबूत कशी करता येईल, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. बिहारमधील गरीब, वंचित आणि महिलांनी रेकॉर्ड ब्रेक मतदान केलं आणि आज विकासासाठी आपला निर्णयही सांगितला.”

“बिहारच्या प्रत्येक मतदाराने हे सिद्ध केलं आहे की, ते फार आकांक्षावादी आहेत आणि त्यांचं प्राधान्य फक्त अन् फक्त विकासाला आहे. बिहारची स्वप्न काय, त्यांच्या अपेक्षा काय, हे बिहारमध्ये 15 वर्षांनतरही NDA ला मिळालेल्या आशीर्वादाने स्पष्ट होत आहे.”

“बिहारच्या युवा पिढीने सिद्ध केलं की, नवं दशक हे बिहारचं असेल. आत्मनिर्भर बिहार ही त्यासाठीची गुरुकिल्ली असेल. बिहारच्या तरुणांनी एनडीएच्या संकल्पावर विश्वास ठेवला आहे. तरुणांच्या या उर्जेमुळे एनडीएला आणखी परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे”, असेही ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. (PM Narendra Modi Tweet After NDA Win Bihar Election 2020)

“बिहारच्या महिलांनीही यावेळी रेकॉर्ड संख्येत मतदान केलं. त्यामुळे आत्मनिर्भर बिहारमध्ये त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. बिहारमधील मातृशक्तीला नवीन आत्मविश्वास देण्याचा NDA ला संधी मिळाली, याचा मला आम्हाला अभिमान आहे. हा आत्मविश्वास आम्हाला बिहारमध्ये पुढे चालण्यास बळ देईल,” असेही मोदी म्हणाले.

“एनडीएच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर बिहारमधील शेतकरी, व्यापारी, दुकानदार, गरीब अशा प्रत्येक घटकाने विश्वास दाखवला. मी पुन्हा बिहारच्या प्रत्येक नागरिकाला आश्वासन देतो की, आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी नेहमी काम करत राहू,” असे मोदींनी यावेळी सांगितले.

“लोकांच्या आशीर्वादामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा लोकशाहीचा विजय झाला. बिहारमधील भाजप कार्यकर्ते, त्यासोबतच घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेले काम हे नक्कीच आश्चर्यचकित करणारे आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि बिहारमधील जनतेचे मनापासून आभार,” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

(PM Narendra Modi Tweet After NDA Win Bihar Election 2020)

संबंधित बातम्या :

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

जनतेनं एनडीएला दिलेलं समर्थन अद्भुत, देशाची दिशाभूल करणाऱ्यांना धडा मिळाला : अमित शाह