AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचा दौरा, फडणवीस-शिंदे यांनी फुंकले मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मुंबई केंद्रीत होते. मुंबई शहराचे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कसा भकास केला हेच आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपात सत्ता येणार असल्याचा दावा केला.

मोदींचा दौरा, फडणवीस-शिंदे यांनी फुंकले मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग
Image Credit source: tv9
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 19, 2023 | 6:22 PM
Share

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबई दौऱ्यासाठी गुरुवारी दाखल झाले. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचा शुभारंभ आणि भूमिपूजनही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल असल्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी सुरुवातीला ते दाखवून दिले. फडणवीस यांचे भाषण मुंबई केंद्रीत होते. मुंबई शहराचे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कसा भकास केला हेच आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले. फडणवीसांचे संपुर्ण भाषण मुंबई केंद्रीत होते तर एकनाथ शिंदे यांनी दावोसपासून राज्यापर्यंतचा सर्वच उल्लेख केला. अर्थातच मुंबई महानगरपालिकेत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी काय घोळ केले? हे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाही. म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामाध्यमातून मुंबई महानगरपालिका निवडणुकेचे रणशिंग फुंकले.

मुंबईचे समुद्रात जाणारे पाणी व तीन वर्ष मिळालेले दूषित पाणी, रस्त्यांवरील खड्डे, धारावीचा पुर्नविकास, फेऱ्यावाल्यांना देण्यात येणारे कर्ज असे मुंबईशी संबंधित अनेक विषयांना फडणवीस यांनी हात घातला. रखडलेले प्रकल्पाचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोले लगावले. त्यांनी स्वत: ची पोळी भाजण्यासाठी मुंबईचा विकास वर्षनुवर्ष रोखून धरल्याचा आरोप केला.

फडणवीस यांचे भाषण मुंबईचा विकास आणि महानगरपालिकेचे अपयश यांच्यावर होते. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक जिंकण्यात आता कोणतीही कसूर भारतीय जनता पक्ष व शिंदे गट सोडणार नाही, हे दाखवून दिले.

शिंदेंना हवे ट्रिपल इंजिन : राज्यातील डबल इंजिन सरकार अडीच वर्षापुर्वीच आले असते. परंतु काही जणांमुळे ते आले नाही. आता शिंदे यांच्यांमुळे ते आल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. आता डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजिन सरकार आणायचे असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी आपले इरादे स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकारसोबत आता मुंबई महानगरापालिकेतही आपलीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी केला. शिंदे यांनी आपल्या भाषणात मोदी यांचे कौतूक करत त्यांचा करिश्मा जागतिक स्तरावर कसे आहे, हे सांगितले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?