प्रकाश आंबेडकर राजकारणात सक्रीय, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांना मोलाचा सल्ला

| Updated on: Oct 17, 2021 | 5:15 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोलाचा सल्ला दिलाय. आजारपणामुळे पक्षाच्या दैनंदिन कामातून प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिने विश्रांती घेतली होती.

प्रकाश आंबेडकर राजकारणात सक्रीय, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांना मोलाचा सल्ला
प्रकाश आंबेडकर
Follow us on

नागपूर : मोठी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोलाचा सल्ला दिलाय. आजारपणामुळे पक्षाच्या दैनंदिन कामातून प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिने विश्रांती घेतली होती. त्यानंतर आज शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही आंबेडकर यांची भेट घेतली होती. (Prakash Ambedkar Advice to Minister Nawab Malik and Leader of Opposition Devendra Fadnavis)

नवाब मलिक किंवा त्यांचे जावई समीर खान एनसीबीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करत नाहीत. त्यामुळे सध्या केंद्रीय एजन्सीमार्फत सुरु असलेल्या धाडसत्रात कोण डागाळलेलं आणि कोण धुतल्या तांदळाचं आहे हे कळत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच सध्या केंद्रीय एजन्सीमार्फत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी संबंधित असलेल्या लोकांवर धाडसत्र सुरु आहे. मात्र, अशा धाडी अनेकवेळा निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे हे धाडसत्र राजकीय हेतूने केले जात आहे का? अशी शंका उपस्थित होत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलंय.

‘फडणवीसांनी पुरावे सादर केले पाहिजेत’

राज्यातील काही मंत्र्यांनी वसुलीसाठी सॉफ्टवेअरचा वापर सुरु केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला आहे. फडणवीसांनी याबाबत पुरावे सादर केले पाहिजेत. राजकारणात खळबळ निर्माण करण्यासाठी कुणीही असे आरोप करु नये. कारण काही दिवसांनी लोक अशा आरोपांना करमणूक समजून गांभीर्याने घेत नाहीत, असा सल्ला आंबेडकर यांनी फडणवीसांना दिलाय. केंद्रीय तपास यंत्रणा जर कुठे धाड टाकत असतील तर त्या धाडीबाबतची माहिती आणि पुढील कायदेशी कारवाई निश्चित कालावधीत न्याय यंत्रणा आणि जनतेसमोर नेली जावी, अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलीय.

फडणवीसांच्या काळात डिजीटल दलाल- नवाब मलिक

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. जम्मू काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव, महागाई, शेतकरी आंदोलन या मुद्यावरुन नवाब मलिकांनी भाजप आणि संघासमोर प्रश्न उपस्थित केले. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रानं यंत्रणेचा वापर केला तर महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं असं म्हटलं होतं. त्यावरुन देखील मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय.

फडणवीस यांनी सांगितलं की केंद्रानं यंत्रणांचा वापर केला असता अर्ध मंत्रिमंडळ तुरूंगात दिसलं असतं, यावर नवाब मलिक म्हणाले की आम्ही म्हणतो पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेनं जे ऊत्तर दिलं तेच ऊत्तर तुम्हाला इथे मिळेल. भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यावर नवाब मलिकांनी फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होते. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिलाय.

इतर बातम्या :

‘परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु’, रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

अजित पवार यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली की बहिणीशी बेईमानी केली? किरीट सोमय्यांचा सवाल

Prakash Ambedkar Advice to Minister Nawab Malik and Leader of Opposition Devendra Fadnavis