आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी होऊ नये यासाठी….., प्रकाश आंबेडकरांचा शिवसेनेला सल्ला

| Updated on: Sep 09, 2019 | 3:06 PM

वंचित आघाडीला गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यावरुनही त्यांनी काँग्रेस-भाजपला टोला लगावला. आम्ही काँग्रेस नाही तर भाजपला 'गॅस'वर ठेवलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी होऊ नये यासाठी....., प्रकाश आंबेडकरांचा शिवसेनेला सल्ला
Follow us on

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा ‘राहुल गांधी’ होऊ द्यायचा नसेल तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं युतीत मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडू नये, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला  दिला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

वंचित आघाडीला गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यावरुनही त्यांनी काँग्रेस-भाजपला टोला लगावला. आम्ही काँग्रेस नाही तर भाजपला ‘गॅस’वर ठेवलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आमचं आणि ओवेसींचे ठरलंय, मी MIM बरोबर युतीसाठी शेवटपर्यंत आशावादी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेसच्या केंद्र आणि राज्यातल्या नेत्यांच्या वाटाघाटीत आमचं सँडविच किंवा फुटबॉल होऊ नये असं वाटत होते. म्हणून आता काँग्रेसशी चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्री वंचीतचा होणार, पण मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही. मी निवडणूक लढवणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केलं.

याशिवाय मी EVM विरोधाचा मुद्दा सोडलेला नाही. एका हॅकरने माझ्याशी संपर्क साधला आहे. पुढच्या काळात मी कोर्टात EVM हॅकिंगचा मुद्दा मांडणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.

काँग्रेससोबत आघाडी नाहीच

वंचित बहुजन आघाडीने (VBA) विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) आपली रणनिती स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस (Congress) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र, आज त्यावर पूर्णविराम लागला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी स्वतः काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याची  माहिती दिली.

‘एमआयएमसोबत युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न’

काँग्रेससोबत युती करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचे स्पष्ट करतानाच आंबेडकरांनी एमआयएमबाबत बोलणे सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “एमआयएमसोबत युतीसाठी बोलणी सुरू आहे. या युतीसाठी फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत वाट पाहणार आहे. ओवेसी यांच्यासोबत पुण्यात भेट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या युतीबाबत मी आशावादी आहे.”

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी भाजपवर देखील निशाणा साधला. भाजपला वंचित बहुजन आघाडीची भीती असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच काँग्रेस भाजपसोबत हातमिळवणी करत असल्याचा आरोप केला.

संबंधित बातम्या 

काँग्रेसला दरवाजे बंद; ओवेसींची शेवटपर्यंत वाट पाहणार : प्रकाश आंबेडकर