AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाला उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच एकनाथ शिंदेही…, प्रकाश आंबेडकर यांचं युतीबाबत मोठं वक्तव्य

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

भाजपाला उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच एकनाथ शिंदेही..., प्रकाश आंबेडकर यांचं युतीबाबत मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2022 | 8:23 AM
Share

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (Shiv sena) यांच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपाला जसे उद्धव ठाकरे नको होते तसेच त्यांना एकनाथ शिंदे हे देखील नको आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की येत्या काही दिवसांत महापालिका, नागरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटासोबत युती करते की नाही ते पहावे लागेल. जर परिस्थिती अनुकूल दिसली तरच भाजप शिंदे गटासोबत युती करेल.

‘लोकशाहीत मतदार राजा’

दरम्यान राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर दोखील त्यांनी जोरदार टीका केली आहे. वैयक्तिक स्तरावर सुरू असलेलं राजकारण काही योग्य नाही. ही गादीची लढाई नाही, हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावं. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. तोच ठरवेल सत्ता कोणाच्या हातात द्यायची, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

पोटनिवडणुकीवरून आरोप – प्रत्यारोप

सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीवरून सध्या दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. ही गादीची लढाई नाही हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावं. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?