AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हाच राज ठाकरेंना भेटणार, नाराजी दूर होताच महाजनांची भूमिका; काय म्हणाले?

प्रकाश महाजन यांनी माझी नाराजी दूर झाली आहे, असे सांगितले आहे. त्यांची नुकतीच अमित ठाकरे यांच्याोसबत बैठक झाली आहे.

तेव्हाच राज ठाकरेंना भेटणार, नाराजी दूर होताच महाजनांची भूमिका; काय म्हणाले?
prakash mahajan
| Updated on: Jul 17, 2025 | 3:33 PM
Share

Prakash Mahajan : मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्या पक्षाविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांना नाशिक जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या तीन दिवसीय शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीनंतर मात्र पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यानंतर आता महाजन यांनी माझी नाराजी दूर झाली आहे, असे सांगितले आहे. संतापाच्या भरात माझ्याकडून काही गोष्टी घडल्या, असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

प्रकाश महाजन यांच्या नाराजीचे वृत्त समोर आल्यानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी महाजन यांना कॉल केला होत. या दोन नेत्यांवर नाराजीच्या विषयावर चर्चा झाली होती. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशीही महाजन यांची चर्चा झाली होती. आज पुन्हा अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांच्यात बैठकही झाली आहे. या बैठकीनंतर आता महाजन यांनी माझी नाराजी दूर झाली आहे, असे सांगितले.

महाजन नेमकं काय म्हणाले?

आमच्यात नेमकी काय चर्चा झाली आहे, त्याचा तपशील मी सांगणार नाही. मात्र माझ्याकडून काही गोष्टी संतापाच्या भरात घडल्या. आता सगळं सुरळीत चाललं आहे. त्यांनी मला पक्षाचं काम करायला सांगितलंय. अमित ठाकरे माझ्या कायमच संपर्कात असतात. मी त्यांना काही गोष्टी बोललो आहे. त्या बाबींवर हळूहळू तोडगा निघेल, असे यावेळी प्रकाश महाजन यांनी सांगितले.

राज ठाकरे बोलवतील त्या दिवशी भेटणार

त्यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयीही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे साहेबांसोबत माझी चर्चा झाली नाही. मला राज ठाकरे जेव्हा बोलवतील त्या दिवशी मी त्यांना भेटणार. माझे मत अमित ठाकरे राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मी मनसेच कायम सक्रिय असेल, अशी खात्रीही त्यांनी यावेळी दिली.

महाजन यांची नेमकी नाराजी काय होती?

नाशिकच्या इगतपुरी येथे मनसेचे तीन दिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. खुद्द राज ठाकरे हेदेखील या शिबिराला उपस्थित राहिले होते. या शिबिरात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर कोणाही काहीही बोलू नका. मी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करेन, असे यावेळी राज ठाकरे यांनी आदेश दिले होते. तसेच पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र या महत्त्वाच्या शिबिराला प्रकाश महाजन यांना बोलवण्यात आले नव्हते. यावरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मी घरी काय तोंड दाखवू. माझ्या पक्षात आज दिवाळी सुरू आहे आणि माझ्या घरात अंधार आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. तसेच यावेळी नारायण राणे प्रकरणात पक्षाने मला साथ दिल नाही. पण मी ते विसरलो, असेही महाजन म्हणाले होते. आता मात्र त्यांची नाराजी दूर झाली आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल