‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा’; पीकेंचा फिल्मी अंदाजात कुणावर निशाणा?

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा नववी पास असेल तरीही तो मुख्यमंत्री बनेल. तुमचा मुलगा नववी पास असला म्हणजे त्याला काय चपराशीची नोकरी मिळावी का? असा सवाल त्यांनी केला.

‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा’; पीकेंचा फिल्मी अंदाजात कुणावर निशाणा?
‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा’; पीकेंचा फिल्मी अंदाजात कुणावर निशाणा?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2022 | 2:16 PM

पाटणा: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची सध्या जनस्वराज्य पद यात्रा सुरू आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून प्रशांत किशोर यांनी रोजगार आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावरून राजकारण्यांवर जोरदार हल्ला सुरू केला आहे. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar), राजद नेते लालूप्रसाद यादव (lalu prasad yadav) आणि तेजस्वी यादव सध्या त्यांच्या रडारवर आहे. अब राजा का लड़का राजा नहीं बनेगा. देशात लोकशाही आहे. जनता मतदान करेल तोच राजा बनेल, असं म्हणत प्रशांत किशोर यांनी लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. चंपारण येथे पिपरा पंचायतीतील स्थानिकांशी चर्चा करताना त्यांनी हे विधान केलं.

जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी तुम्हाला देशाचा राजा निवडण्याचा अधिकार दिला. तुम्ही निवडाल तो राजा बनेल अशी व्यवस्था दिली. देशात आता लोकशाही आहे. जनता ज्याला मतदान करेल, तोच राजा बनेल, असं प्रशांत किशोर म्हणाले.

तुम्हाला आता बिहारच्या भविष्यासाठी मतदान करायचं आहे. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार किंवा मोदींच्या भविष्यासाठी मतदान करायचं नाही. मते मागण्यासाठी राजकीय पक्ष तुमच्या दारात येतील. पण तुम्ही सजग राहिलं पाहिजे. तुम्ही जर सजग राहिला नाही तर कोणताही मोठ्यातला मोठा नेता तुमचं आयुष्य सावरू शकणार नाही. तुम्हाला तुमच्या मतांची किंमत समजली पाहिजे, असंही ते म्हणाले.

जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांना सावध करायला आलो आहोत. आम्ही संवाद साधायला आलो आहोत. आम्ही गांधीजींचा फोटो घेऊन चाललो आहोत. गांधींजीसोबत देश उभा राहिला तर देश स्वतंत्र होईल. तुम्ही पुन्हा एकदा गांधींजींसोबत उभं राहा. तुमची गरीबी दूर होईल, असं आवाहनही त्यांनी केलं.

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा नववी पास असेल तरीही तो मुख्यमंत्री बनेल. तुमचा मुलगा नववी पास असला म्हणजे त्याला काय चपराशीची नोकरी मिळावी का? असा सवाल त्यांनी केला.