AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा सातत्याने शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे. अंधारे यांच्या टीकेला आता प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
| Updated on: Oct 16, 2022 | 9:30 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा सातत्याने शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे. मोदींची मिमिक्री केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र तरी देखील त्यांची टीका सुरूच आहे. आता अंधारे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारे या कोण आहेत, त्यांनी आपला इतिहास तपासावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक यांनी नेमकं काय म्हटलं?

प्रताप सरनाईक यांनी  ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला लोकांची विकास कामे करायची आहेत. या सुषमा अंधारे कोण आहेत? ज्यांनी काल पक्षात प्रवेश केला आणि आज बोलत आहेत. पक्षात येण्यापूर्वी त्यांनी अनेकदा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर टीका केली आहे.  अशी जर एखादी व्यक्ती मीरा-भाईंदर शहरात येऊन काहीही बोलत असेल तर ते चुकीचं आहे. सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा. आपण इथपर्यंत कशा पोहोचलो, आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचा अंधारे यांनी विचार करावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

‘मला विकास करायचाय’

प्रताप सरनाईक यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की, मला सुषमा अंधारे यांच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. मला विकास करायचा आहे. मी मीरा – भाईंदरचा विकास करणार असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. प्रताप सरनाईक यांच्या टीकेला आता सुषमा अंधारे आणि ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला