…तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का? प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना सवाल

संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे नितीश कुमारांना लावलेला नियम महाराष्ट्रात लागू केला तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का ?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला. (Pravin Darekar raised question on statement of Sanjay Raut)

...तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का? प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना सवाल
Yuvraj Jadhav

|

Nov 12, 2020 | 8:19 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत परस्परविरोधी भूमिका मांडतात याचे आश्चर्य वाटते. आधी म्हणतात नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील, नंतर संजय राऊत म्हणतात की तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले तर तिथल्या जनतेचा तो अपमान असेल. जर हाच नियम महाराष्ट्रात लागू केला तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का ?, असा सवाल भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. (Pravin Darekar raised question on statement of Sanjay Raut)

प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकार कोरोनाचा आधार घेत अधिवेशन घेण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप केला. हे अधिवेशन पुढे ढकलतील किंवा 2 दिवसांच् घेतील किंवा घेणारच नाही, असं देखील प्रवीण दरेकर महणाले. राज्य सरकारची विधिमंडळ अधिवेशन घेण्याची मानसिकता नाही. भाजपला महाराष्ट्रातील अनेक प्रश्न अधिवेशनात मांडायचे आहेत. महिला अत्याचार , अतिवृष्टी, बेरोजगारी हे प्रश्न राज्यात आहेत. आम्हाला या प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा घडवून आणायची आहे, असंही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

कोरोना संकटाच्या पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार भांबवलं आहे. राज्य सरकारनं कोणतंही नियोजन केलेले नाही. सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे पण अजून पंचनामे पूर्ण झाले नाहीत तर पैसे कसे मिळणार, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.

मागील आठवड्यात कोकणात गेलो होतो, चक्रीवादळग्रस्त लोकांना अजून वाढीव पैसे मिळालेले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा पगार दिला आहे पण पुढील दोन महिन्याचे नियोजन केले आहे का ? लोकभावना मांडण्याची संधी ही अधिवेशनात असते पण सरकारचे नियोजन लक्षात घेता अधिवेशन होऊच नये अशी सरकारची भूमिका असल्याचं चित्र दिसत आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

Bihar Election Results | काँग्रेसच्या जागा कमी होणं तेजस्वीसाठी राजकीयदृष्ट्या धोका : प्रवीण दरेकर

Bihar Election Results | स्वत:च्या अस्तित्वाचाही विचार करा, प्रवीण दरेकरांचा मिटकरींना टोला

(Pravin Darekar raised question on statement of Sanjay Raut)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें