AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Presidential Election | नितीन राऊतांचे मत बाद करा, भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मागणी कशासाठी?

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त आमदारांचं मत मिळेल, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

Presidential Election | नितीन राऊतांचे मत बाद करा, भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मागणी कशासाठी?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jul 18, 2022 | 2:07 PM
Share

मुंबईः मतदानासाठी माझा नंबर असताना काँग्रेस आमदार नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मध्येच येऊन माझ्याआधी मतदान केलं. त्यामुळे त्यांचं मतदान रद्द करण्यात यावं अशी मागणी भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केली आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक घेतली जात आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि विरोधी गटाकडून यशवंत सिन्हा या दोन उमेदवारांमध्ये ही लढत होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावणाऱ्या काँग्रेसच्या नितीन राऊत यांचं मत बाद करा, अशी मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. दरम्यान, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त आमदारांची मते मिळतील, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

लोणीकरांचे आरोप काय?

भाजप आमदारांनी साडेनाऊ वाजेपासून मतदान करण्यासाठी हजेरी लावली होती. मात्र नितीन राऊत यांनी मध्येच येऊन मतदान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांच्यावर आरोप करताना बबनराव लोणीकर म्हणाले, माझा पहिला नंबर होता. आम्ही एक तास रांगेत उभे राहिले. नितीन राऊत हे अर्धा तास आतमध्ये जाऊन बसले होते. माझं मतदान पहिलं असताना राऊत यांनी मध्येच येऊन मतदान केलं. रांगेतून असं आतमध्ये जाऊन बसता येत नाही. त्यामुळे त्यांचं मतदान रद्द करण्यात यावं, अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे.. यासंदर्भातील व्हिडिओ फुटेजदेखील असल्याचं बबनराव लोणीकरांनी म्हटलं.य

नितीन राऊत काय म्हणाले?

पहिलं मतदान करण्याची संधी प्राप्त झाली. काँग्रेस आघाडीच्या पसंतीला मी मतदान केलं. आमची आघाडी आहे. माझ्या पक्षाने जे आदेश दिले त्यानुसार मतदान केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सिन्हा यांना चांगलं मतदान मिळवून देऊ, असं वक्तव्य काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी केलं.

‘अंतर्रात्म्याचा आवाज ऐकून मतदान होईल’

दरम्यान,  यावेळी मते फुटणार नाहीत तर पार्टीच्या नेराष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त आमदारांचं मत मिळेल, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी आज अंतरात्म्याचा आवाज ऐकला जाईल. बसमधून आमदार आणल्याच्या नाना पटोलेंच्या आरोपांवर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचेही अनेक आमदार बससमधून आणले जातात. राजस्थानमध्ये काँग्रेस आमदार बसमधूनच आणले जातात, नानांना माहित नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?