AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातले सर्वाधीक लोकप्रिय नेते ठरले पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे राष्ट्रपती कितव्या क्रमांकावर? अशी आहे यादी

morning consult survey मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की लोकप्रियतेच्या बाबतीत पीएम मोदींना 76 टक्के मान्यता मिळाली आहे. पीएम मोदींशिवाय इतर देशांच्या नेत्यांचाही या सर्वेक्षणात समावेश आहे, ज्यांना त्यांच्यापेक्षा कमी रेटिंग मिळाले आहे. यामध्ये इटलीच्या पीएम जॉर्जिया मॅलोनी यांचाही समावेश आहे.

जगातले सर्वाधीक लोकप्रिय नेते ठरले पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे राष्ट्रपती कितव्या क्रमांकावर? अशी आहे यादी
पंतप्रधान मोदीImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 09, 2023 | 8:59 AM
Share

मुंबई : जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींनी अव्वल स्थान पटकावले आहे. मॉर्निंग कन्सल्टनुसार, 76 टक्केच्या मान्यता रेटिंगसह पंतप्रधान मोदी हे सर्वात लोकप्रिय जागतिक नेते ठरले. जागतिक स्थरावर पसंतीच्या बाबतीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ओब्राडोर या सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना 66 टक्के रेटिंग मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 37 टक्के स्वीकृती रेटिंगसह  8 व्या स्थानावर आहेत, तर त्याच सर्वेक्षणात, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी 41 टक्के रेटिंगसह 6 व्या स्थानावर आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये मॉर्निंग कन्सल्टने पीएम मोदींना जागतिक स्तरावर सर्वात विश्वासू नेता म्हणून वर्णन केले होते. मॉर्निंग कन्सल्टने (morning consult survey) केलेल्या या सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिल्याचे समोर आले आहे.

अशी आहे इतर देशाच्या नेत्यांची यादी

Famous personality in world

जागतीक स्छरावर कोणत्या नेत्याला किती पसंती?

मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की लोकप्रियतेच्या बाबतीत पीएम मोदींना 76 टक्के मान्यता मिळाली आहे. पीएम मोदींशिवाय इतर देशांच्या नेत्यांचाही या सर्वेक्षणात समावेश आहे, ज्यांना त्यांच्यापेक्षा कमी रेटिंग मिळाले आहे. यामध्ये इटलीच्या पीएम जॉर्जिया मॅलोनी यांचाही समावेश आहे.

त्याच वेळी, सप्टेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले होते की 76 टक्के लोकांनी पीएम मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिली होती आणि त्यांना सर्वात विश्वासार्ह नेता देखील म्हटले होते, तर केवळ 18 टक्के लोकांनी त्यांच्या विरोधात मत व्यक्त केले होते. मॉर्निंग कन्सल्ट निवडून आलेल्या नेत्यांची साप्ताहिक मान्यता रेटिंग तयार करते. या सर्वेक्षणात पीएम मोदी सातत्याने शीर्षस्थानी आहेत, त्यांचे अप्रूव्हल रेटिंग बहुतांशी 70 च्या वर आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे 40 टक्के मान्यता रेटिंगसह सातव्या क्रमांकावर होते, जे मार्चपासून सप्टेंबरमध्ये त्यांचे सर्वोच्च आहे. G-20 शिखर परिषदेच्या समारोपानंतर हे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च रेटिंग मिळाले. यादीतील शीर्ष 10 नेत्यांमध्ये, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना सर्वाधिक 58 टक्के नापसंत रेटिंग होते आणि ते पहिल्या दहा यादीत 10 व्या क्रमांकावर होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.