AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो…वाढदिवसाच्या दिवशी नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा, म्हणाले…

PM Modi 75 Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस असून भारतीय जनता पार्टीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. नरेंद्र मोदी हे आज मध्यप्रदेशच्या दाैऱ्यावर असून त्यांनी महिलांसाठी खास योजना सुरू केलीये. यासोबतच त्यांनी पाकिस्तानला मोठा इशारा दिला.

हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो...वाढदिवसाच्या दिवशी नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा, म्हणाले...
Narendra Modi
| Updated on: Sep 17, 2025 | 1:17 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस असून जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशच्या दाैऱ्यावर असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. मध्य प्रदेशच्या धार जिल्हातून बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचे सिंदूर उजाडले…आम्ही ऑपरेशन सिंदूर करून दहशतवादी ठिकाणे उद्धवस्थ केली. आमच्या वीर जवानांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. आता कालच देश आणि जगाने बघितले की, पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रडून रडून आपली परिस्थिती सांगितली आहे. हा नवीन भारत आहे…हा कोणाच्या परमाणू धमकींना भीत नाही.

पुढे नरेंद्र मोदी यांनी म्हटले, हा नवीन भारत आहे…घरात घुसून मारतो…आजच्याच दिवशी भारतीय सैन्याने अनेक अत्याचारापासून हैद्राबादला मुक्त केले. त्यांच्या अधिकारांची रक्षा करत भारताच्या गाैरवाला प्रस्थापित केले होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आम्हाला प्रेरणा देतो. भारताच्या आन, बाण शानपेक्षा काहीही मोठे नाही. आम्ही जगलो तरीही देशासाठी, प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होवो, असेही त्यांनी म्हटले.

आज भारताच्या लोकांनी विकसित भारत बनवायचा संकल्प घेतलाय. विकसित भारत यात्राचे चार प्रमुख स्तंभ आहेत. भारताची नारी शक्ती, युवा शक्ती, गरीब आणि शेतकरी यांना विकसित भारत या कार्यक्रमात नवीन ऊर्जा देण्याचे काम झाले. आजच्या कार्यक्रमात नारी शक्तीचे विशेष लक्ष ठेवण्यात आलंय. हा कार्यक्रम धारमध्ये होत असला तरीही हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी होतोय आणि पूर्ण देशामध्ये होत आहे. देशातील पूर्ण माता आणि बघिणींसाठी होत आहे.

निरोगी महिला, मजबूत कुटुंब हे मातांना समर्पित आहे. देशातील माता आणि भगिनींनी मला उदारतेने आशीर्वाद दिला आहे. महिलांसाठी चाचण्या आणि औषधे कितीही महाग असली तरी मोफत असतील. सरकारी तिजोरी तुमच्या आरोग्यापेक्षा मौल्यवान नाही. ही मोहीम आजपासून सुरू होत आहे. मी माता आणि भगिनींना स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचे आवाहन करू इच्छितो, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?