AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन, पाकिस्तानची उडाली झोप, थेट मोठा निर्णय घेत…

गेल्या काही दिवसांपासून टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा बंद होती. शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले व्यापार मंडळ भारताच्या दाैऱ्यावर पाठवले असून काही महत्वाचे करार यादरम्यान होऊ शकतात.

पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन, पाकिस्तानची उडाली झोप, थेट मोठा निर्णय घेत...
Donald Trump and Prime Minister Narendra Modi
| Updated on: Sep 17, 2025 | 7:32 AM
Share

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध टॅरिफमुळे ताणले आहेत. मात्र, यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायमच नरेंद्र मोदी यांचे काैतुक करताना दिसतात. त्यांनी स्पष्ट केले की, नरेंद्र मोदी हे महान व्यक्ती आहेत आणि माझे मित्र कायमच राहतील. भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप जास्त मजबूत आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाले. फक्त नाराजच नाही तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच संवाद देखील बंद केला होता. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका मागील काही दिवसांपासून घेतल्याचे दिसतंय. अमेरिकेचे व्यापार मंडळ भारताच्या दाैऱ्यावर अजून काही महत्वाचे करार केले आहेत.

भारता आणि अमेरिकेतील ताणलेले संबंध सुधारताना दिसत असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. टॅरिफच्या वादामुळे या फोनला अधिक महत्व प्राप्त झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला. याबद्दलची पोस्टही डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केली. नरेंद्र मोदी यांनीही पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांचे धन्यवाद मानले.

डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, माझे जवळचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खूप छान फोनवर बोलणे झाले…मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…ते छान काम करत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद..असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटी म्हटले. मात्र, दोघांमध्ये युक्रेन आणि रशिया युद्धाबाबत नेमका काय संवाद झाला हे अद्याप जाहिर झाले नाहीये.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टनंतर  माझा मित्र, राष्ट्रपती ट्रम्प, तुमच्या फोन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. असे म्हणताना नरेंद्र मोदी हे दिसले. फोन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संवादाने जगाला धक्का बसला आहे. कारण बऱ्याच लोकांना अमेरिका आणि भारतातील मैत्री तुटल्याचे वाटत होते. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही मैत्री आणि सोशल मीडियावर पोस्टनंतर पाकिस्तानचा थयथयाट उठला असून पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे थेट ट्रम्प यांच्या भेटीला जाणार असल्याचे सांगितले जातंय.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.