
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस असून जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशच्या दाैऱ्यावर असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. मध्य प्रदेशच्या धार जिल्हातून बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचे सिंदूर उजाडले…आम्ही ऑपरेशन सिंदूर करून दहशतवादी ठिकाणे उद्धवस्थ केली. आमच्या वीर जवानांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. आता कालच देश आणि जगाने बघितले की, पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रडून रडून आपली परिस्थिती सांगितली आहे. हा नवीन भारत आहे…हा कोणाच्या परमाणू धमकींना भीत नाही.
पुढे नरेंद्र मोदी यांनी म्हटले, हा नवीन भारत आहे…घरात घुसून मारतो…आजच्याच दिवशी भारतीय सैन्याने अनेक अत्याचारापासून हैद्राबादला मुक्त केले. त्यांच्या अधिकारांची रक्षा करत भारताच्या गाैरवाला प्रस्थापित केले होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आम्हाला प्रेरणा देतो. भारताच्या आन, बाण शानपेक्षा काहीही मोठे नाही. आम्ही जगलो तरीही देशासाठी, प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होवो, असेही त्यांनी म्हटले.
आज भारताच्या लोकांनी विकसित भारत बनवायचा संकल्प घेतलाय. विकसित भारत यात्राचे चार प्रमुख स्तंभ आहेत. भारताची नारी शक्ती, युवा शक्ती, गरीब आणि शेतकरी यांना विकसित भारत या कार्यक्रमात नवीन ऊर्जा देण्याचे काम झाले. आजच्या कार्यक्रमात नारी शक्तीचे विशेष लक्ष ठेवण्यात आलंय. हा कार्यक्रम धारमध्ये होत असला तरीही हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी होतोय आणि पूर्ण देशामध्ये होत आहे. देशातील पूर्ण माता आणि बघिणींसाठी होत आहे.
निरोगी महिला, मजबूत कुटुंब हे मातांना समर्पित आहे. देशातील माता आणि भगिनींनी मला उदारतेने आशीर्वाद दिला आहे. महिलांसाठी चाचण्या आणि औषधे कितीही महाग असली तरी मोफत असतील. सरकारी तिजोरी तुमच्या आरोग्यापेक्षा मौल्यवान नाही. ही मोहीम आजपासून सुरू होत आहे. मी माता आणि भगिनींना स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचे आवाहन करू इच्छितो, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.