AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | तरीही शरदराव प्रेरणा देतात, राहुल गांधींना धडा देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून पवारांवर कौतुकाचा वर्षाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करत असूनही आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात, असे ते म्हणाले.

VIDEO | तरीही शरदराव प्रेरणा देतात, राहुल गांधींना धडा देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून पवारांवर कौतुकाचा वर्षाव
पंतप्रधानांनी शरद पवारांवर केलेल्या कौतुकाच्या वर्षावाचे आता वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
| Updated on: Feb 08, 2022 | 3:15 PM
Share

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यसभेत काँग्रेसच्या एकूणच कारकीर्दीवर जोरदार हल्ला चढवला. मात्र हे करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पंतप्रधानांनी राहूल गांधींचं (Rahul Gandhi) नाव न घेता त्यांच्यावर टीका केली, मात्र यावेळी शरद पवार यांच्याकडून त्यांनी काहीतरी धडा घ्यायला हवा, आजारी अजूनही ते मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देतात, असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं. विशेष म्हणजे राज्यसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख करत त्यांचे कौतुक केले.

पवार आजारी असूनही प्रेरणा देतात- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2013 पर्यंत देशाने दुर्दशेत दिवस काढले. 2014 मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना जुने दिवसच दिसणार नाही, अशी जोरदार टीका नरेंद्र मोदी यांनी केली. ते म्हणाले, सार्वजनिक जीवनात चढ-उतार येत असतात. त्यातून व्यक्तीगत निराशा निर्माण होते, ती देशावर थोपवू नये. सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि विरोधी बाकावर असताना देशाची चिंता करायची नाही, असं असतं का? कुणाकडून शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करत असूनही आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. तुम्ही नाराज होऊ नका. नाराज होत असाल तर तुमचे जे मतदार संघ आहेत तिथले लोकही उदास होतील, अशी खिल्ली नरेंद्र मोदी यांनी उडवली.

तीन मिनिटात तीन वेळा पवारांचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना आज तीन मिनिटात तीन वेळा शरद पवार यांचा उल्लेख केला. सुरुवातीला राहुल गांधींना उद्देशून बोलताना, कुणाकडून शिकता येत नसेल तकर पवारांकडू शिका असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीन दिला. दुसऱ्यांदा उल्लेख करताना एवढ्या आजारांचा सामना करतानाही शरद पवार राज्यातील लोकांना प्रेरणा देण्याचे काम करतात, असे पंतप्रधान म्हणाले. तर तिसऱ्यांदा उल्लेख करताना कोरोना लसीकरणाच्या बैठकीचे उदाहरण मोदी यांनी दिले. ते म्हणाले, कोरोना काळात मुख्यमंत्र्यांसोबत 23 बैठका घेतल्या. सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न केला. मात्र काही लोकांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सर्वपक्षीय बैठकीत सरकारकडून सादरीकरण व्हायचे. त्यावेळी बहिष्कार टाकण्यात आला. काही लोक आले नाहीत. शरद पवार आले, टीएमसीचे लोक आले. हे संकट मानव जातीवर आले आहे. तुमचे सल्लागार कोण आहेत, आधुनिक चिकित्सा परंपरा आणि भारतीय चिकित्सा परंपरेवर आम्ही काम केले. आयुष मंत्रालयानं खूप काम केलं, अशा शब्दात पंतप्रधानांनी देशात झालेल्या कार्याचा गौरव केला.

इतर बातम्या-

मुंबई लोकल प्रवासात सतर्क रहा! चाकूच्या धाकाने बहीण-भावाची लूट, गर्दी नसताना चौघांनी लुबाडलं

…आणि मंगेशकरांना काढून टाकलं, मोदींकडून लता दीदींचा उल्लेख, काँग्रेसला आरसा दाखवला, गोव्यावर डोळा?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.