AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pritham Munde : गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर प्रीतम मुंडे यांना अश्रू अनावर

Gopinath Munde : महविकास आघाडीचे नेते धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी तिथं उपस्थित अनेक कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केली. गोपीनाथ मुंडे यांनी कामगारांसाठी खूप मोठं काम केलं. त्यांच्या संघर्षाचा आवाज आजही माझ्या कानात घुमतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी मीडियाला दिली.

Pritham Munde : गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर प्रीतम मुंडे यांना अश्रू अनावर
गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर प्रीतम मुंडे यांना अश्रू अनावर Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 03, 2022 | 11:27 AM
Share

परळी – लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले आहेत. त्याचवेळी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर प्रीतम मुंडे (Pritham Munde) यांना अश्रू अनावर झाले. काही जुन्या आठवणी आठल्याने त्या भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. त्यावेळी तिथं राज्यभरातून आलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रीतम मुंडे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तिथं उपस्थित एक महिला रडत होती. त्यावेळी त्या महिलेला त्यांनी आधार देखील दिला आहे. त्याचबरोबर त्या महिला काय बोलत आहे हे देखील त्यांनी ऐकून घेतले.

रडत असलेल्या महिलेचं सांत्वनं केलं

एक महिला तिंथ रडत आली होती. तिचं प्रीतम मुंडे यांनी त्या महिलेची विचारपूर केली. त्यावेळी त्यांनी पतीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर पती एक छोड़ा व्यवसाय करीत होता, मृत्यू झाल्याने सगळं ढासळलं आहे. घरातल्या कुटुंबियांची माहिती घेतली. तसेच काळजी करून नका आपण त्याचं कायतरी करू असं देखील आश्वासन प्रीतम मुंडे यांनी महिलेला दिलं. आज राज्यात गोपीनाथ मुंडेच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यातून लोक आल्याने गोपीनाथ गडावर प्रचंड गर्दी आहे.

धनंजय मुंडे यांनी सांगितली आठवण

महविकास आघाडीचे नेते धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी तिथं उपस्थित अनेक कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केली. गोपीनाथ मुंडे यांनी कामगारांसाठी खूप मोठं काम केलं. त्यांच्या संघर्षाचा आवाज आजही माझ्या कानात घुमतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी मीडियाला दिली. तसेच मी त्यांच्यासोबत खूप वर्षे राहिलो आहे, त्यामुळं त्यांचं स्वप्न पुर्ण करण्याचं काम करतोय. कामगारांसाठी तयार केलेलं महामंडळं पिढ्यानंपिढ्या चालावं अशी माझी इच्छा आहे. महाविकास आघाडीच्या माध्यामातून मी एक प्रयत्न केला आहे. त्यांच्यासोबत अनेकवर्षे राहिल्यानंतर त्यांची स्वप्न मला माहित आहेत. मागच्या सहा-पाच वर्षात ज्या राजकीय घटना घडल्या, त्या मुंडे साहेब असते तर घडल्या नसत्या.

जीवनातली पहिली निवडणूक त्यांनी ज्या पध्दतीने लढवली ती सुद्धा माझ्या चांगली लक्षात आहे अशी आठवण त्यांनी याप्रसंगी सांगितली.

Follow Us
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार