Priyanka Gandhi : प्रियंका गांधींनी महिला पोलिसाचा हात मुरगळला? महागाईविरोधात केलेल्या आंदोलनातील फोटोची चर्चा

प्रियांका गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या प्रचंड संतापलेल्या दिसत आहेत. या फोटोवरूनच त्यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत.

Priyanka Gandhi : प्रियंका गांधींनी महिला पोलिसाचा हात मुरगळला? महागाईविरोधात केलेल्या आंदोलनातील फोटोची चर्चा
प्रियंका गांधींनी महिला पोलिसाचा हात मुरगळला? महागाईविरोधात केलेल्या आंदोलनातील फोटोची चर्चा
Image Credit source: twitter
दादासाहेब कारंडे

|

Aug 05, 2022 | 4:15 PM

नवी दिल्ली : महागाई आणि बेरोजगारीविरोधात (Inflation) काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरूच आहे. आज पुन्हा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला, तर काँग्रेसचे (Congress) राज्यसभा खासदार काळा कुर्ता आणि पगडी घालून संसदेत पोहोचले. याशिवाय प्रियंका गांधींसह (Priyanka Gandhi) काँग्रेस कार्यकर्ते संसदेपर्यंत आंदोलन करत आहेत. यावेळी काँग्रेस नेते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आता काँग्रेस कार्यकर्ते याला कडाडून विरोध करत आहेत आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. दरम्यान, प्रियांका गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या प्रचंड संतापलेल्या दिसत आहेत. या फोटोवरूनच त्यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत.

पोलिसाचा हात मुरगळल्याचा आरोप

प्रियांका गांधी यावेळी प्रचंड संतापलेल्या दिसल्या, त्यांनी एका महिला पोलिसाचा मुरगळल्याचा आरोप या फोटोमुळे होत आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘प्रियांका वड्रांनी ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाला मारहाण केली. त्यांनी तिचा हात पकडून फिरवला. पोलिसांनी कारवाई केल्यावरची ओरड काँग्रेस नेते करतात, मात्र याठिकाणी परिस्थिती उलटी आहे, अशा आरोप आता भाजपकडून होऊ लागला आहे.

भाजपचं ट्विट

Priyanka Vadra gets violent with a lady cop on duty. Grabs her hand, twists and kicks around

फोटोवर दोन्ही बाजुने प्रतिक्रिया

हा फोटो आणि प्रियंका गांधींची संतप्त वृत्ती पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सही चांगलेच संतापले आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘मॅडम तुम्ही ज्ंयाचा हात फिरवत आहात, तीही या देशाची मुलगी आहे, जी परीक्षा पास करून पोलिसात दाखल झाली आहे… आणि हो. तिचे वडील, आई, भाऊ आणि पतीने कोणतीही चोरी केली नसावी.

दिल्लीतलं राजकारण तापलं

काही यूजर्स प्रियांका गांधींना सपोर्ट करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘त्या गांधी आहेत… दडपशाहीच्या विरोधात उभे राहणे हा त्यांचा इतिहास आहे’, तर एका यूजरने लिहिले आहे की फोटोमध्ये पोलीस कुठे आहेत, फेक न्यूज पसरवली जात आहे. सोबतच एका यूजरने मजेशीर शब्दात असेही लिहिले आहे की, ‘जरा विचार करा, रॉबर्ट वाड्रा यांना घरी हाताळताना त्यांची काय अवस्था असेल’. अशा काही कमेंट या फोटोवरून येऊ लागल्या आहेत. मात्र आजच्या आंदोलनामुळे पुन्हा दिल्लीतलं वातावरण तापवलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें