Eknath Shinde Government Live : भाजपातल्या लोकांनी सांगितलं की आमचा देखील अशा बदनामीला विरोध होता – दीपक केसरकर

| Updated on: Aug 05, 2022 | 5:00 PM

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis Live Cabinet expansion Updates : दिवसभरातल्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर

Eknath Shinde Government Live : भाजपातल्या लोकांनी सांगितलं की आमचा देखील अशा बदनामीला विरोध होता - दीपक केसरकर
शिंदे सरकारच्या विस्तारानंतर आता खातेवटपही लांबणीवर पडणार, हाती आली अत्यंत महत्वाची माहितीImage Credit source: tv9marathi

मुंबई – मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोंडीना प्रचंड वेग आला आहे. मुख्यमंत्री (EKNATH SHINDE) उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) कायम दिल्लीत जाऊन भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातले विरोधक हे असंविधानिक सरकार असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्याचबरोबर शिवसेने दाखल केलेल्या सोळा आमदाराच्या याचिकेवर सोमवारी कोर्टात सुनावणी होणार आहे, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  1. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे शुक्रवार दि. 5 ऑगस्ट 2022 रोजीचे कार्यक्रम
  2. दुपारी 3.०० वा. – पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांचे पुनर्वसनाबाबत बैठक. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई,
  3. दुपारी 3.15 वा. – मौजे गोकूळ तर्फे हेळवाक (कोयनानगर), ता. पाटण, जि. सातारा येथे राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) / पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापनेबाबत बैठक. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.
  4. दुपारी 3.30 वा. – शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या (कलेक्टर लँड) हस्तांतरण (फ्री होल्ड) जमिनीचा धारणाधिकार रुपांतरणाबाबत बैठक. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.
  5. दुपारी 3.45 वा. – दरड कोसळून नुकसान झालेल्या रहिवाश्यांना चुनाभट्टी म्हाडा संक्रमण शिबिराच्या इमारतीत घरे मिळण्यासंदर्भात बैठक. स्थळ : मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.
  6. सायं. 04.30 वा. – ब्रिटीश हाय कमिशनचे श्री.अॅलेक्स इलिस यांची सदिच्छा भेट. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.
  7. सायं. 7.00 वा.- तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांची सदिच्छा भेट. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Aug 2022 04:23 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा पुन्हा दिल्ली दौऱ्यावर

    हर घर तिरंगा या भाजपच्या अभियानासंदर्भात उद्या दिल्लीत भाजपची बैठक आहे

    तर रविवारी ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार

    दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत देखील देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होण्याची शक्यता

    देवेंद्र फडणवीस कालच दिल्ली दौऱ्यावरून आले होते, उद्या आणि परवा नियोजित कार्यक्रम असल्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत जाणार

  • 05 Aug 2022 03:50 PM (IST)

    दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

    मी दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार, मी जे बोललो ते खरं आहे

    जर यातला शब्द खोटा निघाला तर सार्वजनिक क्षेत्रातून संन्यास घेईल

    शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांची थ्रेट आहे, तरी ते लोकांबरोबर जातात, लोकांना भेटतात त्यामुळे आमचं टेन्शन वाढतं, असं मला एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं

    आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली नाही

    कोर्टाची सुनावणी सुरु आहे, अंतरिम ऑर्डर सोमवार, मंगळवारपर्यंत येईल

    त्यानंतर सुनावणी सुरुच राहील, त्यामुळे ऑर्डरचा मान ठेवण्यासाठी थांबलोय

    त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल

    कोर्टाचा मान ठेवावा असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही वाटतं

  • 05 Aug 2022 03:26 PM (IST)

    शिवसेनेपाठोपाठ मुंबईतले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकही शिंदे गटात सामील होणार

    राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका धनश्री भांडारकर करणार शिंदे गटात प्रवेश

    पश्चिम उपनगरातल्या माजी नगरसेविका हजारो कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश

  • 05 Aug 2022 03:02 PM (IST)

    पंतप्रधानांचं ठाकरे बद्दलच्या प्रेमाचा साक्षीदार आहे

    दिपक केसरकर - पंतप्रधानांचं ठाकरे बद्दलच्या प्रेमाचा साक्षीदार आहे - उद्धवजी आपल्या पदाचा त्याग करणार होते - कार्यकर्त्यांसमोर ह्या गोष्टी ठेवण्यासाठी वेळ हवा होता - ह्या गोष्टी फक्त आमच्या ३ लोकांना माहिती होतं - ह्यात खूप वेळ गेला मात्र त्यात १२ आमदारांचं निलंबन झालं - भाजपनं सांगितलं आपली बोलणी सुरु असताना हा निर्णय योग्य नाही -* त्यानंतर नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला हे उद्धवजींना आवडले नाही *

  • 05 Aug 2022 01:38 PM (IST)

    शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे शुक्रवार दि. ०५ ऑगस्ट २०२२ चे कार्यक्रम

    शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे शुक्रवार दि. ०५ ऑगस्ट २०२२ चे कार्यक्रम

    सायंकाळी ४.४५ वाजता - गांधी मार्केटला भेट देणार (सायन)

    सायंकाळी ५.१५ वाजता - हिंदमाता येथे भेट देणार (दादर पूर्व)

    सायंकाळी ५.५० वाजता आणि ६.५० वाजता - कोस्टल रोडची पाहणी करणार, वरळी सी फेस, हाजीआली (वरळी)

    सायंकाळी ०७.०० वाजता - इन्फिनिटी स्कल्पचर सुशोभीकरणाचं उद्घाटन आर जे थडानी आणि सर पोचखानवाला जंक्शन, वरळी

    सायंकाळी ७.१५ - नरेश पाटील चौक सुशोभीकरणाचं उद्घाटन (वरळी)

  • 05 Aug 2022 01:37 PM (IST)

    मराठी माणसांची अस्मिता म्हणजे शिवसेना आहे, त्यामुळे मी सेनेत प्रवेश केला आहे

    - उद्धव ठाकरे आणि सेनेबाबतीत सध्या सहानुभूती आहे, शिवाय सेनेतून बाहेर पडलेल्या लोकांनी वेगळा गट स्थापन केला त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सहानुभूती आहे,

    - मराठी माणसांची अस्मिता म्हणजे शिवसेना आहे, त्यामुळे मी सेनेत प्रवेश केला आहे,

    - मान सम्मान राहीन अशी जबाबदारी तुमच्याकडे देणार, असं आश्वासन देण्यात

    - आदित्य ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद सेना एक नंबरचा होईल,

    - शिवसेनेत लवकरच आणखी काही लोकांचा प्रवेश होणार,

    - उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला होणं म्हणजे महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांचा रोष आहे, त्यांच्या गाडीवर हल्ला म्हणजे पोलीस प्रशासनाचं अपयश आहे.

  • 05 Aug 2022 12:57 PM (IST)

    ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला गरज पडते तेव्हा सेक्युलर होतो - इम्तियाज जलील

    ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला गरज पडते तेव्हा सेक्युलर होतो

    मात्र जेव्हा राजकारण करायचं असतं तेव्हा आम्ही भाजपची बी टीम होतो

    मात्र शरद पवारांनी बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही गेलो

    आम्ही बसून एकत्र निर्णय घेतला...

    मुसलमानांचा मोठा व्होट बँक आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी पासून दुर गेला आहे

    भाजपा शिवसेनेचा उपयोग करत आहे

    एकदा का मुंबईवर कब्जा झाला की ते कोणाला कुठे सोडून देतील माहिती नाही

    भाजपला शिवसेनेत दोन गट पाडायचे होते

    मुंबई महापालिका भाजपला घ्यायची आहे त्यासाठी त्यांनी शिवसेनेत भांडणं लावली

    आणि त्यात भाजपा यश मिळालं आहे

    राज्यात दोनचं मंत्री कारभार करणार असतील तर आपल्याला सरकार कशाला पाहिजे

    मंत्रीमंडळ कशाला पाहिजे त्यांना जर वाटत असेल तर असंच ठेवा तर ठेवा .

    अब्दुल सत्तार फूकटाचे भपके आहेत

    आम्ही त्यांना किंमत देत नाही काडीचीही किंमत देत नाही

    आम्ही गीनतीत घेत नाही

    एम आय एमवर बोललं की त्यांचा टीआरपी वाढतो

    मुख्यमंत्री दौऱ्यावेळी सत्तारांनी केली होती जलीलांवर टिका

    संभाजीनगर नामांतर करण्यास आजही माझा विरोध आहे

    संभाजी राजाबद्दव माझ्या मनात आदर आहे

    ज्या शहरात आठ आठ दिवस पाणी मिळत नाही

    शहराचं नावं राजकीय फायद्यासाठी करायचं

    मुसलमान औरंगजेबाला फॉलो करत नाही

    इतिहासाचा तो एक भाग आहे

    तुम्ही इतिहासाचं पान फाडू शकता पण इतिहास बदलू शकत नाही

    तुमच्या आणि माझ्या पैशातून नरेंद्र मोदी पब्लिसिटी करतायेत

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 52 वर्ष हातात धरलं नाही

    आम्ही झेंडा डीपीवर लावत नाही तिरंगा आमच्या रक्तात आहे

    लसीकरणावर मोदींचा फोटो

    घरावर झेंडा नाही लावला तर तुम्ही देशद्रोही

    माझ्या घरावर बघायला येतील त्यांनी झेंडा लावला की नाही...

    2014 पासून 15 ऑगस्टला मी तिरंगा यात्रा काढतो त्याची प्रेरणा नरेंद्र. मोदींनी घेतली

    मुसलमान ही टोपी घालून तिरंगा गाडीवर लावून फिरतो

    आम्ही कोणाकडे जाणार नाही

    आमची ताकद आम्हाला माहिती आहे

    त्यांना वाटत असेल की आमची ताकद आहे तर त्यांनी एक पाऊल टाकलं पाहिजे

  • 05 Aug 2022 12:56 PM (IST)

    कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल

    - कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल,

    - प्रभाग रचनेच्या निर्णयावरून वसंत मोरेंची राज्य सरकारवर टीका,

    - राजकारणाची चीड यायला लागली आहे,हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा,

    - प्रत्येकजण सोईने प्रभाग रचना बदलतो आहे, मोरेंचा राज्य सरकारवर आरोप,

    - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात हिंमत असेल तर महापौरांची निवडही जनतेतून करावी,वसंत मोरेंनी दिले आव्हान

  • 05 Aug 2022 12:28 PM (IST)

    शाहू समाधी च्या निधीसाठी शिवसेनेचे निधी संकलन आंदोलन

    1. शाहू समाधी च्या निधीसाठी शिवसेनेचे निधी संकलन आंदोलन
    2. कोल्हापुरातील महाद्वार रोडवर शिवसेनेकडून केले जाणार निधी संकलन
    3. शिंदे फडणवीस सरकारन एप्रिल 2021 पासूनच्या मंजूर कामांना दिलीय स्थगिती
    4. मंजूर कामात शाहू समाधी स्थळाच्या कामाचाही समावेश
    5. सरकारच्या निर्णयामुळे समाधीस्थळासाठीचा दहा कोटीचा निधी थांबल्याचा दावा
    6. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेकडून निधी संकलन आंदोलन
  • 05 Aug 2022 12:28 PM (IST)

    रोहित पाटलांचा संजय काका पाटलांना पुन्हा धक्का, किदरवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता

    कवठेमहाकाळ नगरपरिषद जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित आर आर पाटील यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील याना पुन्हा एकदा धक्का देत किदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली आहे.

  • 05 Aug 2022 12:02 PM (IST)

    काँग्रेसची संपूर्ण देशभर नौटंकी सुरू आहे - प्रवीण दरेकर

    प्रवीण दरेकर ऑन काँग्रेस आंदोलन

    काँग्रेसची संपूर्ण देशभर नौटंकी सुरू आहे

    ईडी काय आज स्थापन झाली नाही

    हा काही जनतेचा प्रश्न नाही

    महागाई बेरोजगारी यावर आंदोलन करा

    फक्त एका कुटूंबाला खुश करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत

    कॉग्रेस कार्यालयाबाहेर 100 पोलीस होते पण एक कार्यकर्ता नव्हता

    परिवाराला वाचवण्यासाठी आंदोलन सुरू आहे

    राज्याला वेळ देणारा राज्यपाल मी 25 वर्ष पाहिला नाही

    राज्यपाल रोज 50 लोकांना भेटतात

    फक्त नौटंकीसाठी काहींना भेट हवी होती

    ईडी सूडबुद्धीने कारवाई करत नाही

    जाणीवपूर्वक ईडीची कारवाई होत नाही

    आंदोलन या देशात करायचा अधिकार आहे पण नौटंकी करायची हा हेतू असेल

    यांना महागाईचे काही पडले नाही यांना राजकीय बेरोजगारी आलेली आहे

    महागाई बेरोजगारीसाठी पंतप्रधान सक्षम आहे

    ऑन संजय राऊत पत्नी

    ज्यांना चौकशीसाठी बोलावण्याची आवश्यकता असते त्यांना बोलावलं जाते

    ऑन मुंबई बँक

    मुंबई बँकेत पक्षीय राजकारण त्यावेळी आले होते

    आम्ही कुठल्याही पक्षात असलो तरी सहकाराचे कार्यकर्ते आहोत

    सर्वानी एकतपणे काम करण्याचा निर्णय घेतला

    मुंबईतल्या सहकाराचे नेतृत्व आम्ही करत आहोत

    इथे पक्ष नसतो बँकेचे हित आम्ही जपत असतो

    ऑन मंत्रीमंडल विस्तार

    फडणवीस किंवा शिंदे हे घाबरणारे नेतृत्व नाही

    लवकरच विस्तार होईल निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील

    ऑन पुणे महानगर पालिका

    वसंत मोरे आणि मनसेच्या ताकदीवर मी बोलणार नाही

    वसंत मोरे यांना माझ्या शुभेच्छा आहेत

  • 05 Aug 2022 12:02 PM (IST)

    शिवसेना आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद

    शिवसेना आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद

    दिनांक - 5 ऑगस्ट 2022 (आज)

    वेळ - दुपारी 2 वाजता

    ठिकाण - सम्राट हॉटेल, चर्चगेट

    या पत्रकार परिषदेसाठी आपला प्रतिनिधी अवश्य पाठवावा ही विनंती..

  • 05 Aug 2022 11:50 AM (IST)

    जीएसटी सह अन्य विषयावर आज काँग्रेसचा देशभर आंदोलन

    जीएसटी सह अन्य विषयावर आज काँग्रेसचा देशभर आंदोलन

    कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची निदर्शन

    केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 05 Aug 2022 11:41 AM (IST)

    लोकशाही संपवायचं धोरण भाजपचे आहे त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही - सतेज पाटील

    विमानतळाच्या संदर्भात जो निधी आम्ही दिला आहे

    त्याबाबत जमीन अधिकरण करून ताब्यात घेण्यासाठी आज बैठक घेतली

    राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील सहकारावर कोणताही परिणाम होणार नाही

    एका प्रवृत्तीच्या विरोधात नागरिक गेले आहेत, त्यामुळे गोकुळमध्ये सत्तांतर झाले आहे

    सत्ता बदल झाल्यामुळे त्यांना कदाचित असं वाटत असेल पण आम्ही सत्ता असो किंवा नसो आम्ही कायम जनतेत असतो

    2011 पासून जनगगना झाली नाही त्यामुळे काही लॉजिक लावून हे मतदार संघ वाढवले होते

    पण काहीतरी करायचे, निवडणुका पुढे ढकलायचा हा हेतू सरकारचा आहे

    हे जनतेच्या मनातील सरकार नाही हे त्यांना ही माहीत आहे

    8 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ झाले नाही तर मोर्चा काढायला लागणार आहे

    राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासाठी दिलेला निधी रोखणे योग्य नाही

    याबाबत दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटले आहेत

    लोकशाही संपवायचं धोरण भाजपचे आहे त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही

  • 05 Aug 2022 11:34 AM (IST)

    महागाई व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढविलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

    महागाई व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढविलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले, यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.

  • 05 Aug 2022 11:33 AM (IST)

    कॉंग्रेस आज देशभर आंदोलन सुरु केलं आहे

    कॉंग्रेस आज देशभर आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेक गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे.

  • 05 Aug 2022 11:33 AM (IST)

    संजय राऊत मेडिकल टेस्टसाठी जे जे रुग्णालयाकडे रवाना

    संजय राऊत मेडिकल टेस्टसाठी जे जे रुग्णालयाकडे रवाना

    संजय राऊत मेडिकलसाठी रवाना, सोबत ईडीची टीम

    दर ४८ तासांनी त्यांची चौकशी करण्यात येती

    उद्या वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहे

    समन्स दिल्याची माहिती मिळाली आहे.

  • 05 Aug 2022 11:24 AM (IST)

    महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

    महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

    संसदे जवळ प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता

    संसद परिसरामध्ये आंदोलन करायला परवानगी नाही

    संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत काँग्रेस खासदारांचा लॉंग मार्च

  • 05 Aug 2022 11:23 AM (IST)

    कॉंग्रेसकडून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

    संजय निरुपम यांच्यासह सुमारे 15 ते 20 काँग्रेस कार्यकर्त्यांना मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतले. सगळे विरोध करणार होते,

  • 05 Aug 2022 11:14 AM (IST)

    मा. मुख्यमंत्री महोदय यांचे शुक्रवार दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजीचे कार्यक्रम

    1. दुपारी ०३.०० वा. - पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांचे पुनर्वसनाबाबत बैठक. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई,
    2. दुपारी ०३.१५ वा. - मौजे गोकूळ तर्फे हेळवाक (कोयनानगर), ता. पाटण, जि. सातारा येथे राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) / पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापनेबाबत बैठक. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.
    3. दुपारी ०३.३० वा. - शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या (कलेक्टर लँड) हस्तांतरण (फ्री होल्ड) जमिनीचा धारणाधिकार रुपांतरणाबाबत बैठक. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.
    4. दुपारी ०३.४५ वा. - दरड कोसळून नुकसान झालेल्या रहिवाश्यांना चुनाभट्टी म्हाडा संक्रमण शिबिराच्या इमारतीत घरे मिळण्यासंदर्भात बैठक. स्थळ : मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.
    5. सायं. ०४.३० वा. - ब्रिटीश हाय कमिशनचे श्री.अॅलेक्स इलिस यांची सदिच्छा भेट. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.
    6. सायं. ०७.०० वा.- तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांची सदिच्छा भेट. स्थळ:- मुख्यमंत्री समिती कक्ष, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई.

Published On - Aug 05,2022 11:11 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.